Friday, July 5, 2024

Video: ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ फेम अन्विताने ‘बडी मुश्किल’ गाण्यावर लावले जोरदार ठुमके, एकदा पाहाच

सामान्य माणसांच्या दैनंदिन आयुष्यातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे मालिका, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. दिवसभराच्या ओढाताणीत संध्याकाळी एकत्र कुटुंबासोबत बघितलेल्या मालिका काही वेगळीच ऊर्जा देतात. त्या मालिकेतील प्रत्येक पात्र हे आपल्या कुटुंबातील एक भाग वाटू लागतो. अशीच सध्या चर्चेत असणारी मालिका म्हणजे ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ होय. मालिकेसोबत मालिकेतील पात्र देखील चांगलीच चर्चेत आहेत. यातील मुख्य भूमिकेत असणारी अन्विता फलटणकर चांगलीच लोकप्रिय झाली आहे. सोशल मीडियावर ती तिच्या चाहत्यांसोबत जोडून असते. अशातच तिचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अन्विताने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती ‘बडी मुश्किल’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तिने हिरव्या रंगाची साडी नेसली आहे. तसेच तिने सगळे केस मोकळे सोडले आहेत. या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तसेच ती खूप सुंदर डान्स स्टेप्स करताना दिसत आहे. (Marathi actress Anvita faltankar share her dance video on social media)

तिचा हा डान्स व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. अनेकजण या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. याआधी देखील अन्विताने तिचे अनेक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या प्रत्येक पोस्टला तिचे चाहते भरभरून प्रतिसाद देत असतात.

तिची ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडत आहे. मालिकेत तिच्यासोबत शाल्व किंजवडेकर दिसत आहे. दोघांची केमिस्ट्री देखील प्रेक्षकांना खूप आवडत आहे. अन्विताने या आधी ‘गर्ल्स’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने ‘टाईमपास’ या चित्रपटात केतकी माटेगावकर हिच्या मैत्रिणीची भूमिका निभावली होती. तसेच शाल्वने देखील अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपटात काम केले आहे. त्याने ‘हंटर’, ‘मेड इन हेव्हन’, ‘बकेट लिस्ट’, ‘एक सांगायचंय’ या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-रिंकूने आपल्या कुत्र्यासोबत मस्ती करतानाचा व्हिडिओ केला शेअर; तुम्हालाही आवडेल अभिनेत्रीचं ‘प्राणीप्रेम’

-आनंद गगनात मावेना! तब्बल ‘इतके’ फॉलोव्हर्स पूर्ण झाल्याच्या आनंदात ऋताने शेअर केली खास पोस्ट

-‘सफर खूबसूरत है, मंजिल से भी…’, म्हणत पाठक बाईंनी साडीमध्ये दाखवला दिलकश अंदाज

हे देखील वाचा