Saturday, March 15, 2025
Home मराठी गुलाबी रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये अन्विता दिसतेय एकदम ‘बार्बी डॉल’, कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव

गुलाबी रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये अन्विता दिसतेय एकदम ‘बार्बी डॉल’, कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव

झी मराठीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही एक लोकप्रिय मालिका आहे. प्रेक्षकवर्गाला ही मालिका आणि मालिकेतील पात्र देखील मोठ्या प्रमाणात आवडतात. तसेच यातील ओम आणि स्विटूचे पात्र चांगलेच गाजत आहे. एक वेगळी कहाणी समोर घेऊन आलेल्या या मालिकेने अल्पावधीतच यशाचे शिखर गाठले आहे. मालिकेत शाल्व किंजवडेकर आणि अन्विता फलटणकर हे मुख्य भूमिकेत आहेत. त्या दोघांची केमिस्ट्री देखील प्रेक्षकांना आवडते.

मध्यंतरी या मालिकेत अनेक चढ-उतार आले होते. त्यामुळे प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. तरीही मालिकेवरील प्रेक्षकांचे प्रेम काही कमी झाले नाही. या मालिकेतील स्विटू (अन्विता) हिच्या अभिनयाचे देखील सर्वत्र कौतुक होत असते. अन्विता सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. अशातच तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हाला तिला ओळखणे देखील अवघड होईल. (Marathi actress Anvita faltankar share her photo on social media)

अन्विताने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने गुलाबी रंगाचा एक शॉर्ट ड्रेस घातला आहे. तिने आरशासमोर उभी राहून हा फोटो काढला आहे. या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. ती अगदी बाहुलीप्रमाणे दिसत आहे.

https://www.instagram.com/p/CT_Xy0vKAMH/?utm_medium=copy_link

तिने शेअर केलेल्या या फोटोवर तिचे अनेक चाहते तसेच कलाकारांच्या देखील प्रतिक्रिया उमटत आहे. या फोटोवर अभिनेत्री स्पृहा जोशी हिने हार्ट ईमोजी पोस्ट केल्या आहेत, तर अदिती द्रविड हिने “क्यूट,” अशी कमेंट केली आहे. तसेच तिचे अनेक चाहते या फोटोवर कमेंट करत आहेत. काहींना तिचा हा ड्रेस खूप आवडला आहे.

तिच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, अन्विताने या आधी ‘गर्ल्स’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने ‘टाईमपास’ या चित्रपटात केतकी माटेगावकर हिच्या मैत्रिणीची भूमिका निभावली होती. तसेच ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेत तिच्यासोबत असणाऱ्या शाल्वने देखील अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपटात काम केले आहे. त्याने ‘हंटर’, ‘मेड इन हेव्हन’, ‘बकेट लिस्ट’, ‘एक सांगायचंय’ या चित्रपटात काम केले आहे. मालिकेत त्यांच्या जोडीला खूप प्रेम मिळत आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राखी सावंतला पती रितेशचा पाठिंबा, राघव चड्ढांच्या ‘या’ विधानावर घेतली त्यांची शाळा

-बाकीच्या पर्वांपेक्षा खास आहे हे पर्व; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसं बघू शकाल सलमानचा ‘बिग बॉस’

-फोटो शेअर करून चाहत्यांना ‘फिटनेस गोल’ देतेय जान्हवी कपूर; वर्कआउट पाहून तुम्हीही कराल कौतुक

हे देखील वाचा