Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

अन्विता फलटणकरला करावा लागला होता बॉडी शेमिंगचा सामना; म्हणाली, ‘लोक म्हणायचे जास्त खाऊ नको नाहीतर…’

सामान्य माणसांच्या दैनंदिन आयुष्यातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे मालिका. दिवसभराच्या ओढाताणीत संध्याकाळी एकत्र कुटुंबासोबत बघितलेल्या मालिका काही वेगळीच ऊर्जा देतात. त्या मालिकेतील प्रत्येक पात्र हे आपल्या कुटुंबातील एक भाग वाटू लागतो. अशीच सध्या चर्चेत असणारी मालिका म्हणजे ‘येऊ कशी तशी मी नांदायला.’ ही मालिका प्रेक्षकांच्या खास पसंतीस पडत आहे.

गरीब आणि श्रीमंत यांच्यात असणारी आर्थिक आणि वैचारिक दरी या मालिकेतून स्पष्ट होत आहे. या मालिकेतील स्वीटू आणि ओमचे पात्र देखील प्रेक्षकांना खूप आवडत आहे. प्रामुख्याने यामधील गोड, गुबगुबीत अभिनेत्री सर्वांना आवडली आहे. मालिकेतील मुख्य अभिनेत्री नेहमी सडपातळ आणि फिट असावी या सौंदर्याच्या व्याख्या डावलून निर्मात्यांनी काहीतरी वेगळा प्रयोग केला आहे. प्रेक्षक देखील याला जोरदार प्रतिसाद देत आहेत. पण अनेकदा अन्विताला तिच्या जाड असल्यामुळे टोमणे देखील ऐकावे लागले आहेत. याचा खुलासा तिने एका मुलाखतीमध्ये केला आहे. (marathi actress anvita phaltankar share her experience about body shaming)

एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत अन्विताने सांगितले की, “लोकं लहानपणापासूनच मला माझ्या शरीरावरुन टोमणे मारतात. सगळेजण मला ‘ए जाडे’ या नावाने आवाज द्यायचे. अगदी काही लोकांनी असे देखील म्हटले आहे की, खूप खाऊ नकोस नाहीतर तुझ्यासोबत लग्न करायला कोणी तयार होणार नाही. त्यावेळी मला खूप वाईट वाटायचे. पण आज प्रेक्षकांना माझा अभिनय आवडत आहे. लोक माझ्या जाडीमुळे नाही, तर माझ्या अभिनयाच्या जोरावर मला पारखतात. याचा मला खूप आनंद आहे.”

ओम आणि स्वीटू म्हणजेच शाल्व किंजवडेकर आणि अन्विता फलटणकर हे सध्या टेलिव्हिजनवरील सर्वांचे आवडते जोडपे आहे. त्या दोघांनी याआधी देखील अनेक चित्रपटात काम केले आहे. अन्विताने या आधी ‘गर्ल्स’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने ‘टाईमपास’ या चित्रपटात केतकी माटेगावकर हिच्या मैत्रिणीची भूमिका निभावली होती. शाल्वने देखील अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपटात काम केले आहे. त्याने ‘हंटर’, ‘मेड इन हेवन’, ‘बकेट लिस्ट’, ‘एक सांगायचंय’ या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-इंडियन आयडलच्या ‘या’ स्पर्धकाचे फळफळले नशीब, करण जोहरकडून मिळाली थेट ‘धर्मा’साठी गाणी गाण्याची संधी

-अफेअरच्या चर्चांमध्ये सिद्धार्थ मल्होत्राने कियाराला रस्त्यावरच घेतले उचलुन, पुढे जे झाले…

-रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी बेडरेस्टवर आहे नुसरत भरुचा; ‘या’ कारणामुळे अचानक बिघडली होती तब्येत

हे देखील वाचा