Tuesday, June 24, 2025
Home मराठी मोठी बातमी! अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरवर कोसळला दुःखाचा डोंगर, जवळचा प्रिय व्यक्ती हरपला

मोठी बातमी! अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरवर कोसळला दुःखाचा डोंगर, जवळचा प्रिय व्यक्ती हरपला

मराठी मनोरंजनविश्वातील ‘शेवंता’ नावाने लोकप्रिय आणि प्रसिद्ध झालेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपूर्वाच्या लहान भावाचे दुःखद निधन झाले आहे. तिचा भाऊ ओंकार नेमळेकरचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या केवळ २८ व्या वर्षी ओंकारचे झालेले निधन हा सहाजिकच तिच्यासाठी आणि तिच्या घरच्यांसाठी खूप मोठा धक्का आहे. अपूर्वाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही दुःखद बातमी दिली आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून भावाचे काही फोटो शेअर करत एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.

अपूर्वाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले,
“माझा प्रिय भाऊ ओमी जिथे आहे तिथे खुश राहा,

आयुष्यात कधी कधी नुकसान, तोटा होतच असतो. यात कोणीच काहीही बदल करु शकत नाही. पण तुला गमावणे ही माझ्या आयुष्यातील सर्वात अवघड बाब आहे. मनापासून सांगायचे तर मला तुला निरोप द्यायचाच नव्हता. मला तुला एक दिवस किंवा एक सेकंद कधीच सोडायचे नव्हते मी त्यासाठी कधीच तयार नव्हते. पण मृत्यूबद्दल हे एक सत्य आहे आणि ते म्हणजे, प्रेम मरत नाही, म्हणून मी प्रेमावर विश्वास ठेवायला शिकले. काही नाती कधीच तोडता येत नाही.

कारण जरी शरीराने तू इथे नसला तरी तुझा आत्मा कायम इथेच असेल. तू नेहमीच माझ्याबरोबर असशील. आपण पुन्हा नक्कीच भेटू आणि तिथे आपल्याला वेळ आणि जागा देखील वेगळे करु शकणार नाही. पण त्या दिवसापर्यंत तुझे हृदय कायमच माझ्यासोबत असेल. माझे तुझ्यावर प्रेम होते, प्रेम आहे आणि ते नेहमीच राहिल. तू माझ्या मनात, हृदयात कायमच असशील. माझ्या लहान भावा, आपण लवकरच भेटू. Rest in peace”.

तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत तिला सांत्वना दिली आहे. अपूर्वा तिच्या भावाच्या खूप जवळ होती. बिग बॉसच्या घर देखील तिला अनेकदा भावाबद्दल भरभरून बोलताना लोकांनी पाहिले होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

‘शांती’ मालिकेपासून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या मंदिराने क्रिकेट अँकरिंग करत मिळवली होती तुफान वाहवा

HAPPY BIRTHDAY : ‘इंडियन आयडॉल’च्या ऑडिशनमध्ये रघुरामला केले होते रिजेक्ट, ८ वर्षांनंतर मिळवला गायनाचा मोठा पुरस्कार

 

हे देखील वाचा