सध्या मराठी मालिकेसाठी सुगीचे दिवस चालू आहेत. दिवसभरातील विरंगुळा घालवण्यासाठी रात्री दमलेली मंडळी हमखास टीव्हीसमोर बसलेली दिसते. या मालिकाही प्रेक्षकांचे मनोरंजन करायला कुठेही कमी पडत नाहीत. याचमुळे प्रेक्षक मालिकांना आणि त्यातील पात्रांना भरभरून प्रेम देतात.
सध्या चर्चेत असलेली लोकप्रिय मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते’ होय. यातील पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. विशेष म्हणजे मुख्य भूमिकेत असलेली अभिनेत्री मधुराणी गोखले (Madhurani Gokhale) आपल्या दिमाखदार अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडत आहे. अभिनेत्री सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. अशातच तिने चाहत्यांच्या उपयोगात येईल अशी एक पोस्ट शेअर केली आहे. (marathi actress arundhati aka madhurani gokhale summer special cool look viral)
उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत. सूर्य देव जणू काय आग ओकत आहे! सगळी कडे भयंकर ऊन पडलेलं आपण पाहू शकतो. यालाच अनुसरून मधुराणी गोखलेने केलेली पोस्ट आता चाहत्यांमध्ये चांगलीच पसंत केली जात आहे.
मधुराणीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, अभिनेत्री गुलाबी रंगाची साडी नेसून भर उन्हात पोझ देत आहे. सोबतच तिच्या हातात छत्री आणि डोळ्यावर गॉगल्स देखील आहेत. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, ‘उन्हाळा वाढतोय, काळजी घ्या मंडळी!’
चाहत्यांमध्ये अरुंधतीची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. दुसरीकडे ‘आई कुठे काय करते’ मालिकेत अनेक रंजक वळणं पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी ही मालिका कुठेच कमी पडत नाहीये.