सध्या अनेक मराठी कलाकार विविध राजकीय पक्षांत प्रवेश करण्याच्या बातम्या समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajkta Mali) राज ठाकरे यांच्या पाडवा मेळाव्याला हजेरी लावली होती. त्यामुळे आता प्राजक्ता मनसेचा झेंडा हातात घेते की काय अशा बातम्या रंगल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध मराठी अभिनेत्री असावरी जोशी (Asavari Joshi) यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे अभिनेत्री प्रिया बेर्डेंनंतर आणखी एका अभिनेत्रींनी घड्याळ हाती बांधल्याची चर्चा सध्या राजकीय क्षेत्रात रंगली आहे.
याबाबत संपुर्ण माहिती अशी की, सध्या विविध शहरांतील महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे राजकीय मंडळींसह अनेक कलाकारही तयारीला लागली आहेत. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार दिग्गज मराठी अभिनेत्री असावरी जोशी यांनी मुंबईमधील राष्ट्रवादीच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात पक्षाचे प्रमुख नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. येणाऱ्या महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. त्याचप्रमाणे त्यांच्यावर पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी महत्वाची जबाबदारी दिली जाण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान अभिनेत्री असावरी जोशी यांनी गेल्याच वर्षी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्या लोकसभेची निवडणुक लढवणार असल्याचेही बोलले जात होते. मात्र आता त्यांनी एकाच वर्षात कॉंग्रेसला रामराम ठोकत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. सध्या राष्ट्रवादी हाच कलाकारांसाठी झटणारा पक्ष असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे. अभिनेत्री असावरी जोशी यांनी ‘मला सासू हवी’, ‘माझे मन तुझे झाले’, ‘मुलगी झाली हो’, ‘ठिपक्याची रांगोळी’ अशा गाजलेल्या मालिकेत काम केले आहे तर अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटातही त्या झळकल्या आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
- हेही वाचा –
- आयुष्यातील २० वर्षे ‘जम्पिंग जॅक’ जितेंद्र यांनी घालवली होती चाळीत, ५ वर्षांच्या संघर्षानंतर मिळाली होती चित्रपटात संधी
- धर्मेंद्र यांनी घातलेला ‘तो’ राडा, ज्यामुळे मोडले होते जितेंद्र आणि हेमा मालिनीचे लग्न, वाचा खास लव्हस्टोरी
- मैत्रिणीसाठी गाणे गाताना अचानक रडू लागली आम्रपाली दुबे, जाणून घ्या नक्की काय आहे कारण