Friday, July 5, 2024

‘आम्ही एक पाऊल पुढे आलो आहोत…’, अभिनेत्री अश्विनी महांगडेने हाती घेतला नवीन वसा

मनोरंजनविश्वातील अनेक कलाकार हे त्यांचे काम सांभाळून आपण समाजाला काही देणं लागतो या भावनेने प्रेरित होऊन समाजासाठी समाजातील विशिष्ट वर्गासाठी काही कार्य हाती घेतात आणि ते यशस्वीरीत्या सांभाळतात देखील. असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आतापर्यंत मोठया प्रमाणावर सामाजिक कार्य केले आहे. आता या यादीत अजून एका अभिनेत्रीची भर पडणार आहे. छोट्या पडद्यावरील अतिशय उत्तम आणि जिवंत अभिनय करणारी अभिनेत्री अश्विनी महांगडेने देखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिच्या नवीन उपक्रमाची माहिती दिली आहे.

 

नवीन वर्षाचा मुहूर्त साधत अश्विनीने तिच्या ‘फ्लाईंग एंजल’ या नवीन संस्थेची घोषणा केली आहे. या संस्थेबद्दल तिने तिच्या एका पोस्टमध्ये सविस्तर माहिती दिली आहे. अश्विनीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “बरेच दिवस १ जानेवारी ला नवीन काहीतरी करीत आहोत अशा पोस्ट पाहील्या असतील. सगळ्यांच्या मनात प्रश्न उभे राहिले की आता हे काय नवीन करतात.? मुळात आपल्या माणसांना सोबत घेवून पुढे जाणे याला मी आणि बाबा प्राधान्य देतो. पण जे सोबत आहेत त्यांची कष्ट करण्याची तयारी असायला हवी.

रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य. च्या माध्यमातून गेले 3 वर्ष महाराष्ट्रात काम करताना महिलांसाठी विशेष काम करण्याची संधी मिळाली. अनेक अशा महिला ज्यांच्या अंगी कला आहे पणं त्यांना योग्य माणसं भेटत नाहीत जे त्यांच्या कलेला आणखी वेगळ्या माणसांसमोर घेवून जावू शकतात. म्हणून हा घाट घातला आहे.

तुमच्या अंगची कला तुम्हाला पैसे तर कमवून देईल पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे #नाव आणि ते मिळवून देण्याची जबाबदारी आमची. अशा महिला, मुली ज्यांना काहीतरी करायचे आहे पणं नेमके काय करू याचे मार्गदर्शन मिळत नाही तर या माध्यमातून आम्ही उत्तम मार्गदर्शक तुमच्यासाठी आणत आहोत जे तुम्हाला स्वतःच्या पायावर उभे राहायला मार्ग मोकळा करून देतील.

आता आम्ही एक पाऊल पुढे आलो आहोत आणि तुम्हीही एक पाऊल पुढे या. स्वतःसाठी जगा. आपल्यातील कलेला जगवा. प्रत्येक पुरूषाने घरातील स्त्री ला तिच्यातील गुणांना वाव मिळावा यासाठी प्रत्येक पुरूषाने तिच्या पाठीशी उभे रहायला हवे.

तुमची बहीण म्हणून मी अश्विनी महांगडे आणि भाऊ म्हणून निलेश बाबा जगदाळे कायम उभे आहोत. अट फक्त एक तुमच्या यशात आम्ही आमचे समाधान शोधू पणं तुम्ही मेहनत करायला कमी पडू नका. सविस्तर लवकरचं बोलूयात आज आत्ता फक्त सर्वांच्या अशीर्वादाने Flying Angel चा लोगो सादर करीत आहोत.”

अश्विनीने सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असून ती सतत या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. अश्विनीने स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत राणूअक्का ही भूमिका साकारली. त्यानंतर ती आता ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेत अनघा ही भूमिका साकारताना दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कडक! शिवानी बावकरचे फोटो पाहून लागिर झालं जी
रश्मी देसाईचा हटके लूक! चाहत्यांना पाडतोय भुरळ, पाहा फोटो गॅलरी

हे देखील वाचा