Friday, February 21, 2025
Home मराठी ‘तू इतकी सेक्सी का आहेस?’, अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या फोटोंवरील चाहत्याची कमेंट वेधतेय लक्ष

‘तू इतकी सेक्सी का आहेस?’, अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या फोटोंवरील चाहत्याची कमेंट वेधतेय लक्ष

मराठी सिनेसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या त्यांच्या सिनेमांपेक्षाही जास्त त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतात. या अभिनेत्रींमध्ये आवर्जुन समावेश करावा अशी अभिनेत्री म्हणजे भाग्यश्री मोटे होय. सन २०१७ मध्ये ‘काय रे रास्कल्ला’ या सिनेमातून भाग्यश्रीने सिनेविश्वात पदार्पण केले होते. तिच्या सिनेमांव्यतिरिक्त भाग्यश्रीचा सोशल मीडियावरही चांगला वावर आहे. तिला सोशल मीडियावर साडे चार लाखांहून अधिक चाहते फॉलो करतात. त्यामुळे तिच्या प्रत्येक पोस्टला हजारो लाईक्स मिळतात. अशात तिने हॉट फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सध्या सोशल मीडियाचे तापमान वाढवत आहेत.

अभिनेत्री भाग्यश्री मोटे (Bhagyashree Mote) हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. भाग्यश्रीच्या या पोस्टमध्ये एकूण ४ फोटो आहेत. भाग्यश्रीचे हे सर्व फोटो समुद्र किनाऱ्यावरील आहेत. या फोटोंमध्ये भाग्यश्री एकदम ग्लॅमरस आणि हॉट अंदाजात दिसत आहे. तिने राखाडी रंगाची बस्टियर आणि काळ्या रंगाची शॉर्ट परिधान केली आहे.

भाग्यश्रीने या फोटोला “वॉश स्लॉश”, असे कॅप्शन दिले आहे. तिच्या या फोटोवर आतापर्यंत ३३ हजारांहून अधिक लाईक्स आणि शेकडो कमेंट्स मिळाल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhagyaashree Mote (@bhagyashreemote)

भाग्यश्रीच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. एका चाहत्याने कमेंट करत लिहिले की, “जरा जास्तच हॉट दिसत आहेस.” दुसऱ्या एका चाहत्याने एका गाण्याचे बोल कमेंट करत लिहिले की, “वॉटर से खेलती हो, मजे तुम लेती हो, हमें ना लेती हो, जो माँगू टेल मी व्हाय.”

Bhagyashree-Mote-Instagram-Post
Photo Courtesy Instagrambhagyashreemote

आणखी एकाने लिहिले की, “तू इतका सेक्सी का आहेस?”Bhagyashree-Mote-InstagramPhoto Courtesy: Instagram/bhagyashreemote

भाग्यश्रीच्या कामाबाबत बोलायचं झालं, तर तिने ५ सिनेमात आणि एका मालिकेत काम केले आहे. यामध्ये ‘सिया के राम’ मालिकेसोबत, ‘काय रे रास्कल्ला’, ‘माझ्या बायकोचा प्रियकर’, ‘पाटील’, ‘चिकटी गाडिलो चिथाकोतुडू’, ‘भवई’ या सिनेमांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

काली माताच्या हातात दिसला LGBTQचा झेंडा अन् सिगारेट, #ArrestLeenaManimekalai होतंय ट्विटरवर ट्रेंड

आलियाचा १३ सेकंदाचा ‘तो’ व्हिडिओ पाहून तिच्या आईलाही बसला शॉक, मुलीच्या चाहत्यांना उघडपणे म्हणाली…

थेट इंटरनेटवर लीक झाली होती अभिनेत्रीची ‘ती’ न्यूड क्लिप, घरातून बाहेर निघायचीही झालेली बोंब

हे देखील वाचा