छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री धनश्री कडगावकर म्हणजे तुमच्या आमच्या सर्वांचीच लाडकी ‘वहिनीसाहेब’. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील ‘वहिनीसाहेब’ भूमिकेने धनश्री चांगलीच लोकप्रियता मिळवून दिली. २०२० मध्ये जेव्हा धनश्रीने ती प्रेग्नेंट असल्याचे जाहीर केले, तेव्हापासून ती भरपूर चर्चेत आली. २९ जानेवारी २०२१ ला धनश्रीने एका गोंडस मुलाला जन्म दिला.
धनश्री नेहमीच तिचे तिच्या बाळासोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. मात्र तिने या कोणत्याही फोटोंमध्ये बाळाचा चेहरा दाखवला नव्हता. मात्र धनश्रीने नुकतीच एक पोस्ट तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केली असून, या पोस्टमध्ये तिने तिच्या बाळाचे नाव आणि सोबतच तिच्या बाळाचा गोंडस फोटो सर्वांना दाखवला आहे.
धनश्रीच्या बाळाचे नुकतेच बारसे झाले. या बारशाचे काही फोटो धनश्रीने इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. धनश्री आणि तिचा नवरा दुर्गेशने त्यांच्या बाळाचे नाव ‘कबीर’ ठेवले आहे. ही पोस्ट शेअर करताना तिने लिहिले, “बाळाचे बारसे झाले आहे आणि नाव ठेवले आहे ‘कबीर’…कुरररर!” धनश्रीने या पोस्टमध्ये तिच्या बाळाचे फोटो देखील शेअर केले आहे. धनश्रीने फोटो शेअर केल्यानंतर तिच्या फोटोंवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
धनश्री सोशल मीडियावर खूप ऍक्टिव असते. प्रेग्नेंट असल्याची गोड बातमी तिने एका व्हिडिओतून शेअर केली होता. कुणी तरी येणारं गं म्हणत हा व्हिडिओ तिने आपल्या नवऱ्याच्या वाढदिवसादिवशी शेअर केला होता. नुकतेच धनश्रीने तिला तिची जुनी जीन्स बसली असल्याचा आनंद व्यक्त करत एक पोस्ट शेअर केली होती. घट्ट का असेना मात्र जुने कपडे बसण्यास सुरुवात झाली, अशी तिची मजेशीर पोस्ट चांगलीच व्हायरल झाली होती.
‘माझी या प्रियाला प्रित कळेना’ या मराठी मालिकेतून धनश्रीने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते. त्यानंतर ‘गंध फुलांचा गेला सांगून’, ‘जन्मगाठ’ या मालिकेतूनही धनश्री प्रेक्षकांसमोर आली होती. मात्र, ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून धनश्री घराघरात पोहचली. २०१३ मध्ये धनश्रीने दुर्वेशसोबत लग्नगाठ बांधली.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-नाशकात पोलिसांकडून रेव्ह पार्टीचा पर्दाफाश! मराठी बिग बॉस फेम हिना पांचाळसह २२ जणांना अटक










