Thursday, August 7, 2025
Home मराठी काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ‘वहिनीसाहेब’ दिसतायत एकदम झक्कास; धनश्रीचा फोटो पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ‘वहिनीसाहेब’ दिसतायत एकदम झक्कास; धनश्रीचा फोटो पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे धनश्री काडगावकर होय. तिने झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेतून सर्वांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. धनश्री देखील इतर कलाकारांप्रमाणे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून ती प्रेक्षकांना तिच्या बाबत माहिती देत असते. सध्या ती टेलिव्हिजनपासून दूर आहे, परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांशी जोडून आहे. अशातच तिचे काही ग्लॅमरस फोटो समोर आले आहेत.

धनश्रीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिने काळ्या रंगाचा एक सुंदर लाँग ड्रेस घातला आहे. या ड्रेसवर तिने कोणतीच ज्वेलरी घातली नाही. केवळ हातात एक अंगठी घालून केस मोकळे सोडले आहे. तसेच तिने लावलेली लाल रंगाची लिपस्टिक काळ्या रंगाच्या ड्रेसवर खुलून दिसत आहे. या ड्रेसमध्ये ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. (Marathi actress dhanashri kadgaokar share her glamorous photos on social)

तिचा हा ग्लॅमरस अंदाज तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. अनेकजण या फोटोवर कमेंट करत आहेत. या फोटोवर अभिनेत्री भक्ती रत्नपारखी हिने “कमाल,” अशी कमेंट केली आहे. तसेच बाकी अनेक चाहते या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.

धनश्रीने ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत खलनायिकेची भूमिका निभावली होती. या भूमिकेने तिला खूप ओळख दिली. परंतु काही दिवसांनी गरोदर असल्याने तिने ही मालिका सोडून दिली. धनश्रीने मागच्या वर्षी एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. ती तिच्या मुलासोबतचे अनेक फोटो देखील सोशल मीडियावर शेअर करत असते. धनश्रीने या आधी ‘चिठ्ठी’, ‘ब्रेव हार्ट’, ‘गंध फुलाचा गेला सांगून’ या मालिकांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ये चाँद सा रोशन चेहरा’, समृद्धी केळकरच्या लूकवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

-मल्हार अडकेल का अंतराच्या प्रेमात? योगिताचा नवीन लूक पाहून, चाहत्यांमध्ये रंगलीय एकच चर्चा

-‘मुलं जन्माला घालायला वेळ कधी मिळतो?’, मलायकाने विचारलेल्या प्रश्नावर कपिलचे मजेशीर प्रत्युत्तर, म्हणाला…

हे देखील वाचा