Thursday, August 7, 2025
Home मराठी ‘लाल परी कुठे चालली?’ धनश्री काडगावकरचा हा फोटो पाहून चाहते करतायेत कौतुकाचा वर्षाव

‘लाल परी कुठे चालली?’ धनश्री काडगावकरचा हा फोटो पाहून चाहते करतायेत कौतुकाचा वर्षाव

मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगावकर होय. तिने झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेतून सर्वांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. धनश्री देखील इतर कलाकारांप्रमाणे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून ती प्रेक्षकांना तिच्याबाबत माहिती देत असते. सध्या ती टेलिव्हिजनपासून दूर आहे, परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांशी जोडून आहे. अशातच तिने तिचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

धनश्रीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही साडीमधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने लाल रंगाची सुंदर अशी साडी नेसली आहे. यावर तिने डायमंडचा नेकलेस, ईअरिंग आणि मॅचिंग ब्रेडलेट घातले आहे. यासोबत तिने कपाळी छोटीशी टिकली लावून केस मागे बांधले आहेत. या साडीमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. (Marathi actress dhanashri kadgaokar share her photo on social media)

तिचा हा लूक तिच्या चाहत्यांना देखील खूप आवडला आहे. अनेकजण तिच्या या फोटोवर कमेंट करत आहेत. तिच्या एका चाहत्याने या फोटोवर कमेंट केली आहे की, “लाल परी कुठे चालली?” तर आणखी एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “भारतीय संस्कृती, भारतीय परंपरा.” अशाप्रकारे तिच्या या फोटोवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

धनश्रीने ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत खलनायिकेची भूमिका निभावली होती. या भूमिकेने तिला खूप ओळख दिली. परंतु काही दिवसांनी गरोदर असल्याने तिने ही मालिका सोडून दिली. धनश्रीने मागच्या वर्षी एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. ती तिच्या मुलासोबतचे अनेक फोटो देखील सोशल मीडियावर शेअर करत असते. धनश्रीने या आधी ‘चिठ्ठी’, ‘ब्रेव हार्ट’, ‘गंध फुलाचा गेला सांगून’ या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच काही दिवसांपूर्वी ती ‘घेतला वसा टाकू नका’ या पौराणिक मालिकेत दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा