Sunday, March 1, 2026
Home मराठी मराठी अभिनेत्रीने म्हाताऱ्या आजीकडून विकत घेतल्या पणत्या, सोशल मीडियावर व्हिडीओ तूफान व्हायरल

मराठी अभिनेत्रीने म्हाताऱ्या आजीकडून विकत घेतल्या पणत्या, सोशल मीडियावर व्हिडीओ तूफान व्हायरल

दिवाळी हा सण प्रकाशाचा सण म्हणून ओळखला जातो. या सणात घरोघरी रांगोळ्या, पणत्या, दिवे यांची आरास केली जाते. यंदा बाजारात अनेक डिझाईनर दिवे-पणत्या उपलब्ध झाल्या आहेत. परंतु, या कृत्रिम पणत्यांकडे पाठ फिरवत एका मराठी अभिनेत्रीने मातीच्या पणत्या खरेदी करण्यास पसंती दर्शवली आहे.

‘स्वप्नांच्या पलीकडे’, ‘सूर राहू दे’ या मालिकांमधून अभिनेत्री गौरी नलावडे (Gauri Nalavade) घराघरांत लोकप्रिय मिळवली आहे. सध्या गौरीचा पणत्या विकत घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. यामध्ये अभिनेत्री रस्त्यावरच्या एका म्हाताऱ्या आजींकडून मातीच्या सुबक पणत्या विकत घेत असल्याचं दिसत आहे. मोठ्या दुकानांमध्ये न जाता गौरीने रस्त्यावर पारंपरिक व मातीच्या पणत्या खरेदी करण्यास प्रदान्य दिले आहे.

गौरी नलावडेने हा व्हिडीओ शेअर करताना तिने कॅप्शन लिहिले की “यावर्षी दिवाळीत मी हाताने बनवलेल्या पणत्या खरेदी करण्यास प्राधान्य दिलं. आजी खूश, मी खूश…शुभ दीपावली!” अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तिच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत.

कमेंट करताना एकाने लिहिले की, “किती गोड ! गौरी तू खूप सुंदर दिसत आहेस” दुसऱ्याने लिहिले की, “अंधारातून प्रकाशाकडे…त्या आजीला नक्कीच मदत झाली असेल” तर आ्रणखी एकाने लिहिले की, “छान अशा व्यक्तींची गरज आहे आज” गौरी नलावडेच्या या कृतीमुळे पारंपरिक पणत्यांचा वापर करण्याला प्रोत्साहन मिळेल अशी आशा आहे. यामुळे मातीच्या पणत्या बनवणाऱ्या कारागीरांनाही मदत होईल.

 गौरी नलावडे ही मराठी चित्रपट आणि मालिकांमधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिचा जन्म 11 ऑगस्ट 1987 रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे झाला. तिने शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतून पूर्ण केले. भरती विद्यापीठातून तिने कला शाखेची पदवी प्राप्त केली. गौरीला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. शाळेत असतानाच तिने अनेक नाटकांमध्ये काम केले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला.
गौरीने 2015 मध्ये रिड्राफ्ट या शॉट फिल्ममधून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यानंतर तिने अनेक शॉर्ट फिल्म्समध्ये काम केले. (Marathi actress Gauri Nalavade bought her great-granddaughter from her old grandmother the video went viral on social media)

आधिक वाचा-
घाणेरडे मेसेज करणाऱ्या युजरला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रियदर्शनी इंदलकरने झापले; म्हणाली…
‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णीचा दिवाळी स्पेशल लूक; पाहा फोटो

हे देखील वाचा