Friday, August 1, 2025
Home मराठी गौतमी देशपांडेच्या ऑफ शोल्डर ड्रेसमधील फोटोने अमृता खानविलकरलाही घातली भुरळ; कमेंट करत म्हणाली…

गौतमी देशपांडेच्या ऑफ शोल्डर ड्रेसमधील फोटोने अमृता खानविलकरलाही घातली भुरळ; कमेंट करत म्हणाली…

आपल्या नटखट, चंचल ‘सई’ या पात्राने घराघरात पोहोचलेली मराठमोळी अभिनेत्री म्हणजे गौतमी देशपांडे होय. गौतमी देशपांडेने नुकतेच झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘माझा होशील ना’मध्ये काम केले आहे. मालिकेने तिला भरभरून प्रेम आणि ओळख दिली. या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. परंतु तिच्या बाबतीत आजही प्रेक्षकांच्या मनात तेवढेच प्रेम आहे. सोशल मीडियावर देखील ती मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. अशातच तिने तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

गौतमीने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाचा एक सुंदर ड्रेस घातला आहे. तिने ऑफ शोल्डर काळ्या रंगाचा लाँग ड्रेस घातला आहे. तिने पायात ड्रेसला मॅचिंग काळ्या रंगाचे सॅंडल घातले आहेत. गळ्यात एक छोटी चैन घातली आहे. तिने सगळे केस मोकळे सोडले आहेत. तसेच कानात ईअरिंग घातले आहेत. या फोटोमध्ये ती फारच सुंदर दिसत आहे. (Marathi actress Gautami Deshpande share her photo on social media)

तिने शेअर केलेला हा फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. तसेच अनेक कलाकारांना देखील तिचा हा लूक खूप आवडला आहे. अभिनेत्री अमृता खानविलकर हिने या फोटोवर “लूकिंग सो क्यूट,” अशी कमेंट केली आहे. या सोबतच ऋतुजा बागवे आणि अन्विता फलटणकर यांनी देखील कमेंट केल्या आहेत.

गौतमी ही टेलिव्हिजनवरील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर देखील तिची तगडी फॅन फॉलोविंग आहे. तिच्या प्रत्येक पोस्टला तिचे चाहते भरभरून प्रतिसाद देत असतात. तिने ‘माझा होशील ना’ या मालिकेच्या आधी ‘सारे तुझ्याच साठी’ या मालिकेत काम केले होते. या मालिकेत तिच्यासोबत हर्षद अटकरी मुख्य भूमिकेत होता.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-तरुणांना मागे टाकत ‘बिग बॉस’ जिंकली होती ‘ही’ मिश्यांमधील वृद्ध महिला, पाहून तुम्हीही व्हाल अचंबित

-बोल्ड फोटोंमुळे राधिका आली होती ट्रोलर्सच्या निशाण्यावर; ‘माझं शरीर…’, म्हणत सुनावले त्यांना खडेबोल

-‘त्या’ व्यक्तीमुळे लता दीदी आयुष्यभर राहिल्या अविवाहित, ‘अशी’ आहे त्यांची अपुरी प्रेमकहाणी

हे देखील वाचा