Tuesday, July 9, 2024

‘परम सुंदरी’ गायत्री दातारच्या ‘बोल्ड एँड ब्युटीफुल’ लूकवर नेटकरी क्लीन बोल्ड

‘तुला पाहते रे’ या मालिकेमधून एक सुंदर अभिनेत्री पुढे आली. ती अभिनेत्री म्हणजेच गायत्री दातार. मालिकेतील तिचे ईशा नावाचे पात्र सर्वांना खूप आवडले होते. या मालिकेत तिने अभिनेता सुबोध भावेसोबत काम केले होते. मालिकेची कहाणी देखील प्रेक्षकांना खूप आवडली होती. यातून गायत्री नावारूपाला आली. ती सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे फोटो ती नेहमीच शेअर करत असते. अशातच तिच्या काही बोल्ड फोटोंनी सोशल मीडियावर आग लावली आहे.

गायत्रीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, गायत्रीने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि आणि लाल रंगाचा स्कर्ट घातलेला दिसत आहे. तिने गळ्यात ऑक्साइड नेकलेस तसेच नोजपिन घातली आहे. सोबतच सगळे केस मोकळे सोडले आहेत. तिचा मेकअप तिच्या या बोल्ड लूकला अगदी साजेसा दिसत आहे. (Marathi actress Gayatri datar share her bold photos on social media)

हा फोटो शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “जो आंखो से बया होते है, वो लब्ज शायरी मैं कहा होते हैं.” गायत्रीचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. अनेकजण व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आहेत. या फोटोवर सुबोध भावे याने हार्ट ईमोजी पोस्ट केली आहे. तसेच आणखी एका चाहत्याने “परमसुंदरी” अशी कमेंट केली आहे. आणखी एकाने “लय खतरनाक” अशी कमेंट केली आहे. तिचा हा लूक चांगलाच व्हायरल होत आहे.

गायत्री दातार ही टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने एकाच मालिकेत काम केले आहे. पण या मालिकेने तिला खूप प्रसिद्धी मिळवून दिली. ती सध्या ‘चला हवा येऊ द्या’ या शोमध्ये काम करत आहे. या शोमध्ये तिची विनोदी भूमिका देखील प्रेक्षकांना खूप आवडत आहे. तिच्या अभिनयाला तिच्या चाहत्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मलायका अरोराला आवडतो ‘अशा’प्रकारचा व्यक्ती, मिलिंद सोमणपुढे केला खुलासा

-निधन झाले गायिकेचे, पण सपना चौधरीलाच ठरवले मृत; अफवेने उडाली होती कुटुंबीयांची झोप

-ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे ट्विटर अकाऊंट कायमचे बंद, ‘ही’ आहे शेवटची पोस्ट

हे देखील वाचा