Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘कातिल अदा’, गायत्री दातराचे फोटो पाहून चाहत्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव

‘तुला पाहते रे’ या मालिकेमधून एक सुंदर अभिनेत्री पुढे आली, ती अभिनेत्री म्हणजेच गायत्री दातार होय. मालिकेतील तिचे ईशा नावाचे पात्र सर्वांना खूप आवडले होते. या मालिकेत तिने अभिनेता सुबोध भावे याच्यासोबत काम केले होते. मालिकेची कहाणी देखील प्रेक्षकांना खूप आवडली होती. यातून गायत्री नावारूपाला आली. ती सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे फोटो ती नेहमीच शेअर करत असते. अशातच तिचे साडीमधील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

गायत्रीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने चॉकलेटी रंगाची साडी नेसली आहे. तिने वेगळ्या पद्धतीने साडी नेसलेली आहे. या साडीवर तिने ऑफ शोल्डर चॉकलेटी रंगाचा ब्लाऊज घातला आहे. तिने यावर सोनेरी रंगाची ज्वेलरी घातली आहे. या फोटोमध्ये तिने केस मोकळे सोडले आहेत. या फोटोमध्ये ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. (Marathi actress gayatri datar share her saree look photo viral on social media)

हा फोटो शेअर करून गायत्रीने लिहिले आहे की, “इन आंखों की मस्ती के.” तिच्या चाहत्यांना तिचे हे फोटो खूप आवडले आहेत. तिच्या या फोटोवर एका चाहत्याने “कातील अदा,” अशी कमेंट केली आहेत. आणखी एका चाहत्याने “आंख है भरी भरी,” अशी कमेंट केली आहे. तसेच इतर चाहते देखील तिच्या या फोटोवर प्रतिक्रिया देत आहेत.

गायत्री दातार ही टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने एकाच मालिकेत काम केले आहे. पण या मालिकेने तिला खूप प्रसिद्धी मिळवून दिली. ती सध्या ‘चला हवा येऊ द्या’ या शोमध्ये काम करत आहे. या शोमध्ये तिची विनोदी भूमिका देखील प्रेक्षकांना खूप आवडत आहे. तिच्या अभिनयाला चाहत्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अक्षयच्या आईच्या निधनावर पंतप्रधान मोदींनी लिहिलं भलं मोठ्ठं पत्र; वाचून अभिनेताही झाला भावुक

-ट्रोलर्सवर गरजली अर्शी खान, गणरायाच्या पूजेचे ‘हे’ फोटो केले होते पोस्ट

-‘बिग बॉस’च्या ‘या’ स्पर्धकांनी दिलाय जगाला निरोप; कोणी केली आत्महत्या, तर कोणाला आला हार्ट अटॅक

हे देखील वाचा