Saturday, October 18, 2025
Home मराठी मराठी अभिनेत्रींनी पारंपारिक पोशाख परिधान करत चाहत्यांना दिल्या दसऱ्याच्या शुभेच्छा

मराठी अभिनेत्रींनी पारंपारिक पोशाख परिधान करत चाहत्यांना दिल्या दसऱ्याच्या शुभेच्छा

शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) सर्वत्र दसरा साजरा होत आहे. आपल्या भारतात प्रत्येक सणाला काहीतरी महत्व असते. त्यामुळेच सगळे एकत्र येऊन हे सण आनंदाने आणि उत्साहाने साजरे करत असतात. यातीलच एक सण म्हणजे दसरा. चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार या दिवशी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्यांच्या चाहत्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा देत आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्रींनी मराठमोळा साज-शृंगार करून सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने सोशल मीडियावर तिचे काही पारंपारिक पोषाखातील फोटो शेअर करून दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने पांढऱ्या रंगाची साडी घातली आहे. तसेच सुंदर अशी ज्वेलरी घालून फोटो शेअर केले आहेत.

बिग बॉस फेम अभिनेत्री वीणा जगताप हिने सोशल मीडियावर तिचा एक व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडिओमध्ये तिने नऊवारी साडी नेसली आहे. तसेच नाकात शाही नथ, चंद्रकोर, पायात कोल्हापुरी असा सगळा साजशृंगार केला आहे.

अभिनेत्री मानसी नाईक हिने इंस्टाग्रामवर साऊथ इंडियन लूक करून फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने तिच्या चाहत्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबत तिने कॅप्शन दिले आहे की, “दसऱ्याला केले मी, सोळा शृंगार, प्रदीप राव आहेत माझे प्रेम भरतार.”

लाडकी अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने सोशल मीडियावर तिचे काही केशरी रंगाच्या साडीमधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. हे फोटो शेअर करून तिने सगळ्यांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

‘माझा होशील ना’ फेम गौतमी देशपांडे हिने देखील तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून साडीमधील काही फोटो शेअर करून चाहत्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

माधवी नेमळेकर हिने दसऱ्याची पूजा करताना एक व्हिडिओ काढून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ शेअर करून तिने देखील प्रेक्षकांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेत्री समिधा गुरू हिने लाल रंगाची साडी परिधान करून एक सुंदर फोटोशूट केले आहे. या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. हे फोटो शेअर करून तिने सगळ्यांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेत्री मिताली मयेकर हिने तिचा पती सिद्धार्थ चांदेकरसोबत एक सुंदर फोटो शेअर करून दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

बिग बॉस फेम रुपाली भोसले हिने देखील पारंपरिक अंदाजात फोटो शेअर करून तिच्या चाहत्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

सनी लिओनीची लाडकी लेक झाली सहा वर्षांची, वाढदिवसानिमित्त गोंडस फोटो केले शेअर

आदेशानंतरही ईडीच्या कार्यालयात हजर नाही झाली जॅकलिन, एजंसीने बजावला तिसरा समन्स

भारीच ना! ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या निर्मात्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय, ऐकून नाचू लागतील चाहते

हे देखील वाचा