Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

पारंपारिक वेशभूषेत ‘या’ मराठमोळ्या लावण्यवतींनी दिल्या दिपावलीच्या शुभेच्छा! पाहा फोटो

दिवाळी हा भारतातील महत्वाच्या सणांमधील एक सण आहे. भारतात अनेक सण-उत्सव मोठ्या आनंदाने साजरे करण्याची परंपरा खूप जुनी आहे. दिवाळीत फटाके, रांगोळी, तोरण, फराळ, या छोट्या छोट्या गोष्टी आनंद देऊन जातात. या दिवसात अनेक कलाकार देखील सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर करून चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत.

‘सैराट’ चित्रपटातून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करून तिने चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोमध्ये रिंकू खूपच सुंदर दिसत आहे. तिने पिवळ्या रंगाची सुंदर अशी साडी नेसली आहे. यासोबत तिने लाल रंगाचा ब्लाऊज घातला आहे. तिच्या आजूबाजूला पणत्या लावलेल्या दिसत आहे. (Marathi actress give best wishes of diwali on social media)

सोज्वळ आणि गोड अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने अत्यंत सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने पिवळ्या रंगाची सुंदर अशी नऊवारी साडी नेसली आहे. यासोबत तिने सगळा मराठमोळा साजशृंगार केला आहे. हे फोटो शेअर करून तिने दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेत्री आणि डान्सर अमृता खानविलकर हिने अत्यंत सुंदर फोटो शेअर करून चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने निळ्या रंगाची अत्यंत सुंदर साडी आणि पिवळ्या रंगाचा ब्लाऊज घातला आहे. तसेच तिने हातात एक आकाश कंदील घेतला आहे. ती आकाश कंदीलासोबत वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे.

‘आई कुठे काय करते’ फेम रुपाली भोसले हिने एक व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडिओमध्ये ती देखील पारंपारिक वेशभूषेत दिसत आहे. तिने लाल रंगाची साडी नेसली आहे.

अभिनेत्री गौतमी देशपांडे हिने पांढऱ्या रंगाचा एक ड्रेस परिधान करून सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. फोटो शेअर करून तिने “शुभ दीपावली” असे कॅप्शन दिले आहे.

संस्कृती बालगुडे हिने इंस्टाग्रामवर तिचे दिवाळीतील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने लाल रंगाची साडी नेसली आहे. तसेच नाकात नथ, गळ्यात ठुशी असा सगळा साजशृंगार केला आहे. फोटो मध्ये ती रांगोळी शेजारी बसलेली दिसत आहे. हे फोटो शेअर करून तिने देखील दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेत्री प्रिया मराठे आणि अभिनेता शंतनू मोघे या सेलिब्रिटी जोडप्याने देखील दिवाळीचा आनंद घेत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी त्यांचा एक सुंदर फोटो शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत.

ऋतुजा बागवे हिने देखील सुंदर फोटो शेअर करून चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोमध्ये तिने पिवळ्या रंगाची सुंदर साडी नेसली आहे. तसेच तिने हातात आकाश कंदील घेतला आहे.

श्रुती मराठे हिने देखील तिचे साडीमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने हातात पणात्यांचे ताट घेऊन फोटो शेअर केला आहे.

कलाकारांनी शेअर केलेल्या या फोटोवर त्यांचे अनेक चाहते प्रतिक्रिया देत आहे. त्यांचे चाहते देखील त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत.

हे देखील वाचा