Wednesday, July 17, 2024

‘तू आई कधी होणार?’, चाहतीच्या प्रश्नावर संतापली हेमांगी कवी; म्हणाली, ‘हे असले प्रश्न…’

मराठी सिनेसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या अभिनयापेक्षा सोशल मीडियावरील पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असतात. यामध्ये अभिनेत्री हेमांगी कवीचे नाव सर्वप्रथम घेतले जाते. हेमांगी कवी तिच्या स्पष्ट आणि रोखठोक वक्तव्यांसाठी नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असते. तिची अनेक वादग्रस्त आणि स्पष्ट वक्तव्ये सोशल मीडियावर चर्चेत येत असतात. सध्या तिच्या अशाच एका कमेंटची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे ज्यामध्ये तिने तिच्या चाहत्याला खडेबोल सुणावले आहेत.

याबाबतची संपूर्ण माहिती अशी की, हेमांगी कवी (Hemangi Kavi) ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि अनेक आव्हानात्मक भूमिकांनी तिने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या अभिनयाइतकीच ती सोशल मिडियावरही नेहमीच सक्रिय असते. तिच्या फेसबूक पोस्ट माध्यमांमध्ये चांगल्याच चर्चेत येत असतात. सध्या तिची पोस्ट नव्हेतर एक कमेंट जोरदार चर्चेत आली आहे.

वास्तविक हेमांगीने नुकताच सोशल मीडियावर तिचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. तिच्या या फोटोवर चाहत्यांच्या जोरदार प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या होत्या. यामध्ये एका नेटकऱ्याने हेमांगीला आई कधी होणार असा प्रश्न कमेंटमध्ये विचारला होता. ज्यामुळे हेमांगीची संतापजनक प्रतिक्रिया पाहायला मिळाली आहे.

या कमेंटला उत्तर देताना हेमांगीने “तुम्हाला नाही वाटत हा खूप पर्सनल प्रश्न आहे. आणि तो असा तुमच्या सारख्या शिकलेल्या व्यक्तीकडून येणे चुकीचे आहे. मी तुमची ही कमेंट इग्नोर करु शकते. पण तुम्हाला आणि आपल्या सारख्या लोकांना कळवायंच आहे की तु लग्न कधी करणार? तुमचा डिवोर्स झालायं का? तुम्ही आई कधी होणार? तुम्हाला किती मुले आहेत? तुमचा पगार किती  हे असले प्रश्न विचारु नयेत,” अशा शब्दात या चाहतीला खडेबोल सुनावले आहेत. तिची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.

हेही वाचा – ‘जक्कल’ मराठी बेवसिरीज, पुण्यातील भीषण हत्याकांडाचा होणार उलघडा
डुप्लिकेट ऐश्वर्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ, व्हिडिओ पाहून तुम्हीही पडाल प्रेमात
हैदराबादमध्ये आलिया भट्टच्या आवाजाची जादू, केसरियाचा तेलुगू व्हर्जन एकून तुम्हीही व्हाल फिदा

 

 

हे देखील वाचा