Saturday, April 19, 2025
Home अन्य केतकी चितळे फेसबूकवर सक्रिय होताच पहिलीच पोस्ट चर्चेत; म्हणाली, ‘निदान आता तरी…’

केतकी चितळे फेसबूकवर सक्रिय होताच पहिलीच पोस्ट चर्चेत; म्हणाली, ‘निदान आता तरी…’

मराठी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitle) तिच्या अभिनयापेक्षा सोशल मीडिया पोस्टमुळेच सर्वात जास्त चर्चेत असते. अलिकडेच केतकी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्टमुळे चांगलीच वादात सापडली होती. केतकीच्या या पोस्टमुळे तिला तुरुंगाची हवाही खायला लागली होती. तेव्हापासून केतकीने सोशल मीडियाला रामराम ठोकला होता. मात्र आता पुन्हा एकदा केतकी फेसबुकवर सक्रिय झाली असुन तिची पहिलीच पोस्ट चर्चेत आली आहे. 

केतकी चितळे ही मराठी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि सौंदर्याने तिने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. केतकी आपल्या अभिनयाइतक्याच सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असते. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन ती नेहमीच विविध विषयांवर आपले रोखठोक मत व्यक्त करताना दिसत असते. परंतु शरद पवार यांच्यावरील पोस्टपासुन तिने सोशल मीडियाला रामराम ठोकला होता. मात्र आता पुन्हा एकदा ती सोशल मीडियावर सक्रिय झाले आहे.

जामीन मिळाल्यानंतर तिला तिच्या फेसबूक अकाउंटचा एक्सेस मिळाला आहे. याच आनंदात केतकीने फेसबूकवर पहिलीच पोस्ट केली आहे, ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये तिने अखेर माझ्या फेसबुकचा एक्सेस परत मिळाला. निदान तात्पुरता तरी, LOL… अशी प्रतिक्रिया दिली आहे. केतकीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान केतकी चितळेने १३ मे २०२२ रोजी शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केली होती. ज्यामुळे तिच्यावर चौफेर टिका झाली होती.

हेही वाचा – लहान मुलाला सोडून काम केल्यामुळे ट्रोल झाली भारती सिंग, नेटकऱ्यांना दिले सडेतोड उत्तर
उर्वशीच्या मनात अजूनही रिषभ पंतसाठी जागा? एक झलक पाहण्यासाठी पोहचली थेट दुबईत
सुपरहिट चित्रपट देऊन नागार्जुनने जिंकली चाहत्यांची मने; लग्न झालेले असतानाही होता ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात

हे देखील वाचा