Wednesday, July 2, 2025
Home मराठी ‘पक्का पक्का प्यार!’ केतकी माटेगावकर पडली प्रेमात…

‘पक्का पक्का प्यार!’ केतकी माटेगावकर पडली प्रेमात…

मराठी सिनेसृष्टीमधील प्राजू म्हणू ओळखली जाणारी प्रसिद्ध अभिनेत्री केतकी माटेगावकर हिने आपल्या दमदार अभिनयाने मराठी इंडस्ट्रीमध्ये वेगळेच स्थान निर्माण केले आहे. केतकी अभिनेत्री सोबतच एक गाजलेली गायिका देखिल आहे.  ‘टाईमपास’ चित्रपटामध्ये तिने ‘मला वेड लागले प्रेमाचे’ हे गाणं तिने स्वत:गायलेलं आहे. आता नुकंतच या गाण्यावरुन अजून एक गाणं प्रद्रशित झालं आहे ते म्हणजे ‘पक्का पक्का प्यार’ असं त्या गाण्याचं नाव आहे.

मला वेड लागले प्रेमाचे म्हणणारी सर्वांची लाडकी प्राजु म्हणजेच गायिका अभिनेत्री केतकी माटेगावकर (Ketaki Mategaonkar) चक्क प्रेमात पडली आहे. पण हे प्रेम खऱ्या आयुष्यात नाही तर तिच्या नवीन गाण्यात. केतकीच ‘पक्का पक्का प्यार’ हे पाहिलं वहिलं पंजाबी गाणं नुकतंच लोकांच्या भेटीला आलं आणि ह्या गाण्यानी इंटरनेट वर धुमाकूळ घातला

‘पक्का पक्का प्यार’ हे एक रोमँटिक गाणं असून केतकी एकदम कलरफुल वेशभूषेत दिसत आहे. नुकतंच केतकीने हे गाणं आपल्या युट्युबवर शेअर केलं आहे आणि याला तिच्या चाहत्यांनी तुफान प्रतिसाद दिलाय. यासोबत सर्वत्र चर्चा ह्या गाण्यामध्ये मध्ये दिसणाऱ्या मिस्ट्री बॉयची होत आहे. कोण आहे हा तिचा पक्का पक्का प्यार वाला ‘वीर’ असा प्रश्न सगळ्या नेटकऱ्यांना पडला आहे, तरी ह्याच उत्तर अजून गुलदस्त्यातच आहे तरीसुद्धा केतकी चे चाहते पूर्ण सोशल मीडियावर याचा उत्सुकतेने शोध घेत आहेत. त्यामुळे केतकीचं पक्का पक्का प्यार आणि हा मिस्ट्री बॉय सर्वत्र व्हायरल होताना आपल्याला दिसतोय.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
चालत्या ट्रेनमध्ये विकी जैनने पकडला अंकिताचा हात; युजर्स म्हणाले, ‘अहो मॅडम! तुमचा फोन…’
नवीन वर्षाच्या अगाेदर समंथाने शेअर केली नाेट; म्हणाली, ‘जे काही नियंत्रित करू शकतो…’

हे देखील वाचा