आर्यन खान अं’मली पदार्थ प्रकरणाने सध्या चांगलाच जोर धरला आहे. त्याला अटक होऊन आता जवळपास २० दिवस उलटून गेले आहे. परंतु अजूनही कोर्टाने त्याचा जामीन मान्य केला नाही. त्याला एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी अटक केले आहे. त्याच्या अटकेनंतर समीर वानखेडे खूप चर्चेत आले आहेत. तसेच आर्यन खानच्या चॅटिंगमध्ये तो चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेसोबत अं’मली पदार्थांबाबत बोलताना आढळला आहे. त्यामुळे आता तिची देखील कसून चौकशी चालू आहे. या प्रकारानंतर समीर वानखेडे यांच्यावर खंडणीचे आरोप लावले जात आहेत. तसेच त्यांना अटक करण्याची तसेच त्यांच्या पदाचा राजीनामा देण्याची देखील मोठ्या संख्येने मागणी केली जात आहे. अशातच एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर हिने याबाबत तिचे मत व्यक्त केले आहे.
अभिनेत्री क्रांती रेडकर हिने ट्विटर अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. तिने लिहिले आहे की, “तुम्ही जेव्हा समुद्राला भरती येते त्यावेळी पोहत असता, तेव्हा कदाचित
तुमचा कालवश होऊ शकतो. परंतु जर निसर्गातील संपूर्ण शक्ती तुमच्याजवळ असेल तर कोणत्याही भरतीमध्ये तुम्हाला बुडवण्याचे सामर्थ्य नाही. कारण त्याला (देवाला) सगळं माहित असते.” यासोबत तिने “गूड मॉर्निंग आणि सत्यमेव जयते” असे लिहिले आहे. (Marathi actress Kranti redkar’s post viral on social media)
When you swim against the tide , it may drown you, but if the almighty is with you , no tide this is world is big enough to drown you. Because , only HE ????????knows the truth ???????????? good morning . SATYAMEV JAYATE.
— Kranti Redkar Wankhede (@KrantiRedkar) October 25, 2021
या पोस्टमधून तिला असे सांगायचे आहे की, तिचे पती समीर वानखेडे हे खरे आहेत आणि कितीही खोटे पुरावे रचले तरी देव त्यांच्यासोबत आहे. त्यामुळे त्यांना काहीच होणार नाही. अनेकजण या फोटोवर कमेंट करून तिला ट्रोल करत आहेत. काहींनी या पोस्टला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, तर काहींनी नकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
क्रांतीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिने २००० मध्ये ‘सून असावी अशी’ या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. मात्र तिला खरी ओळख ‘जत्रा’ या चित्रपटातून मिळाली. यातील तिचे ‘कोंबडी पळाली’ हे गाणे प्रचंड गाजले. पुढे अभिनेत्रीने ‘फुल ३ धमाल’, ‘शहाणपण देगा देवा’, ‘फक्त लढ म्हण’, ‘नो एन्ट्री: पुढे धोका आहे’, ‘खो खो’ अशा चित्रपटांमध्ये काम केले आहे.,
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-पहिली करवाचौथ साजरी करणाऱ्या मानसी नाईकचे फोटो पाहून ‘या’ अभिनेत्रीने केले तिच्या लूकचे कौतुक
-‘नवऱ्याचं रात्री चंद्राबरोबर दर्शन होईल’, म्हणणारी सोनाली करवाचौथसाठी पोहचली दुबईत










