आपल्या आयुष्यात फिटनेसला खूप महत्त्व आहे. त्यात कलाकार म्हटले, तर ते २४ तास त्यांच्या फिटनेसची काळजी घेत असतात. अशीच मराठी टेलिव्हिजनवरील एक नावाजलेली खलनायिका देखील तिच्या फिटनेसची खूप चांगल्याप्रकारे काळजी घेताना दिसत असते. ती अभिनेत्री म्हणजे माधवी निमकर होय. माधवी अनेकवेळा तिचे जिम करताना आणि योगा करताना व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच तिचे काही किलर फोटो समोर आले आहेत.
नुकतेच माधवीने सोशल मीडियावर तिचे काही साडीमधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, माधवी नेहमीप्रमाणेच खूप हॉट आणि सुंदर दिसत आहे. माधवीने केशरी रंगाची एक सुंदर साडी नेसली आहे. तसेच या साडीवर तिने मिसमॅच जांभळ्या रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज घातला आहे. हातात मोत्याच्या बांगड्या तसेच कानात मोठे मोत्याचे झुमके घातले आहेत. तसेच कपाळावर छोटीशी टिकली लावली आहे. या लूकमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. (Marathi actress madhavi nimkar share her hot photos on social media)
हे फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “असा एखादा विचार असतो ज्याच्याकडे तुम्ही कानाडोळा करू शकत नाही आणि अशी एखादी भावना असते जी तुम्ही नाकारू शकत नाही.” तिने शेअर केलेले हे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहेत. अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिने या पोस्टवर “प्रिटी,” अशी कमेंट केली आहे. तसेच बाकी अनेक चाहते देखील या फोटोवर कमेंट करत आहेत.
माधवीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने २००९ साली ‘बायकोच्या नकळतचं’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. यानंतर तिने ‘असा मी तसा मी’ या चित्रपटात काम केले. तिने ‘धावाधाव’, ‘सगळं करून भागले’, ‘संघर्ष’ या चित्रपटात काम केले आहे. यानंतर तिने तिच्या अभिनयाचा मोर्चा मराठी टेलिव्हिजनकडे वळवला. तिने ‘स्वप्नांच्या पलीकडले’, ‘हम तो तेरे आशिक है’, ‘द रायरीकर केस’ या मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या ती स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत नकारात्मक भूमिकेत काम करत आहे. तरी देखील मालिकेतील तिचे पात्र आणि डायलॉग तिच्या चाहत्यांना खास भुरळ घालत आहेत.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-भारीच! कपाळी चंद्रकोर, नाकात नथ अन् केसात गजरा घालून स्मिता गोंदकर दिसतेय एकदम सुंदर
-लईच वाईट झालं! वयाच्या २५ व्या वर्षी मराठी अभिनेत्री ईश्वरी देशपांडेचा अपघातात मृत्यू