Monday, July 1, 2024

अभिनेत्री माधवी निमकरचा थ्रोबॅक फोटो व्हायरल, पाहून ओळखणे देखील होईल कठीण

फिटनेस हा आपल्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग आहे. त्यात कलाकार त्यांच्या फिटनेसला अनन्य साधारण महत्त्व देतात. त्यात मराठी इंडस्ट्रीमधील फिटनेस प्रेमी अभिनेत्री म्हणजे माधवी निमकर होय. माधवी सध्या स्टार प्रवाह या वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत काम करत आहे. माधवी ही अत्यंत फिट आणि बोल्ड आहे. तिचे योगा करताना तसेच व्यायाम करताना फोटो आणि व्हिडिओ ती अनेकवेळा सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचा हा फिटनेस पाहून कोणीही तिच्या प्रेमात पडेल. पण नुकतेच तिने सोशल मीडियावर एक असा फोटो शेअर केला जो पाहून तिला ओळखणेदेखील कठीण होईल.

माधवीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. हा फोटो तिच्या कॉलेजच्या दिवसातील आहे. या फोटोमध्ये ती तिच्या दोन मैत्रिणींसोबत दिसत आहे. या फोटोमध्ये तिने जांभळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. तसेच मॅचिंग अशा बांगड्या, गळ्यातले आणि इअरिंग घातले आहे. यामध्ये ती खूपच वेगळी दिसत आहे. हा फोटो पाहून अनेकांना विश्वास देखील बसणार नाही की, ही आताची फिट आणि ग्लॅमरस माधवी आहे. (marathi actress madhavi nimkar share her throw back photo on instagram)

हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “वेळ गेली पण आठवणी कायमच्या राहिल्या. मिस यू.” तिच्या या फोटोवर अनेक चाहते कमेंट करत आहेत.

माधवीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘नवरा माझा भवरा’, धावा धाव’, ‘हम तो तेरे आशिक है’, ‘सगळं करून भागलं’, ‘असा मी तसा मी’, ‘संग्रह’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने ‘स्वप्नांच्या पलीकडले’ या मालिकेत काम केले आहे. तसेच सध्या तिच्या ‘सुख म्हणजे काय असतं’ या मालिकेतील शालिनी हे पात्र चांगलेच गाजत आहे. या मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत आहे. तरीही तिचे पात्र सर्वांना खूपच आवडले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-माधुरी दीक्षितने परिधान केला तब्बल ‘इतक्या’ लाखांचा लेहंगा; किंमत वाचून तुम्हीही म्हणाल, ‘मार डाला’

श्रीदेवींनी अवघ्या ४ वर्षांच्या वयात ठेवले होते फिल्मी दुनियेत पाऊल; बॉलिवूडमध्ये घ्यायच्या अभिनेत्यांपेक्षाही अधिक फी

अपरा मेहतांनी आपल्या अभिनयाने जिंकली चाहत्यांची मने; तर एकाच व्यक्तीशी थाटला होता दोनदा संसार

हे देखील वाचा