Tuesday, June 24, 2025
Home मराठी ‘ये राते और ये दुरी’, म्हणत मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईकने पतीसाठी बनवला खास व्हिडिओ

‘ये राते और ये दुरी’, म्हणत मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईकने पतीसाठी बनवला खास व्हिडिओ

मराठी चित्रपट सृष्टीतील आयटम गर्ल अशी जिची ओळख आहे ती म्हणजे सर्वांची लाडकी मानसी नाईक. मानसी नाईक ही मराठी चित्रपट सृष्टीतील अत्यंत ग्लॅमरस आणि हॉट अभिनेत्री आहे. तसेच सोशल मीडिया देखील तिचा खूप वावर असतो. सोशल मीडियावर तिचे अनेक डान्स व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असतात. तिचे चाहते देखील तिच्या या व्हिडिओला भरभरून पसंती देत असतात. अशातच मानसीने तिचा पती प्रदीप खरेरासाठी एक व्हिडिओ बनवला आहे.

मानसी नाईकने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंट वरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. तिने ‘ये राते और ये दुरी’ या गाण्यावर व्हिडिओ बनवला आहे. या गाण्यावर तिने हावभाव दिले आहे. हा व्हिडिओ शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “माझा पती माझ्यापासून दूर गेल्यावर माझी अशीच अवस्था होईल.” या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मानसीने नाईट ड्रेस परिधान केला आहे. तसेच मेकअप देखील केला आहे. तिचा या व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. अनेकजण या व्हिडिओवर कमेंट करून तिच्या डान्सचे कौतुक करत आहे. तिचा पती प्रदीपने देखील या व्हिडिओवर कमेंट केली आहे. त्याने लिहिले आहे की, ” मला हा व्हिडिओ खूप आवडला, व्हिडिओ बघताना खूप मज्जा आली.”

मानसी नाईकने या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात तिचा बॉयफ्रेंड प्रदीप खरेरा सोबत लग्न केले आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत होते. तिचा पती प्रदीप हा एक इंटरनॅशनल बॉक्सर आहे. तसेच तो एक अभिनेता आणि मॉडेल आहे.

मानसी नाईक ही मराठी चित्रपट सृष्टीतील एक आघाडीची अभिनेत्री आणि डान्सर आहे. तिने चित्रपटात आणि गाण्यावर डान्स केला आहे. तिने ‘जबरदस्त’, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’, ‘टारगेट’, ‘कुटुंब’, ‘तीन बायका फजिती ऐका’ या सारख्या चित्रपटात काम केले आहे. तसेच ‘वाट बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर या’, ‘असं वाजवा की’ यासारख्या अनेक सुपरहिट गाण्यांवर डान्स केला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा