Saturday, July 6, 2024

हे कसं शक्य! मानसी नाईकला आल्या दाढी- मिशा?, म्हणतेय, ‘मीच प्रदीप खरेरा’

अभिनेत्री मानसी नाईक हिचा मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत हॉट आणि बोल्ड अभिनेत्रींच्या यादीत समावेश होतो. अभिनयासोबत तिने डान्सची कला देखील जोपासली आहे. तिच्या डान्सची झलक आपण सर्वांनी पाहिलीच आहे. तिने मराठीमध्ये अनेक गाण्यांवर डान्स केला आहे. मानसी आजकाल सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे डान्स व्हिडिओ तसेच फोटो देखील ती वारंवार सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच मानसीने तिच्या पतीसोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे.

मानसीने नुकतेच सोशल मीडियावर तिच्या पतीसोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी अत्यंत मजेशीर अंदाजात हा व्हिडिओ बनवला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मानसी नाईकला तिच्या पतीप्रमाणे दाढी आणि मिशा आलेल्या दिसत आहेत. मानसीने तसा फिल्टर वापरला आहे. यात ती म्हणते की, “मी आहे बॉक्सर प्रदीप खरेरा.” यानंतर तिचा पती प्रदीप तिथे येतो आणि म्हणतो की, “मी आहे प्रदीप खरेरा.” ती म्हणते की, “दोन दोन कसे असू शकतात मीचं आहे खरा प्रदीप खरेरा आपण मम्मीला विचारू.” अशाप्रकारे त्यांचा हा मजेशीर व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. (Marathi actress Manasi naik share a video with her husband on social media)

त्यांच्या या मजेशीर व्हिडिओवर सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांच्या खूप प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांना त्यांचा हा व्हिडिओ खूपच आवडला आहे. या व्हिडिओवर सगळे हसण्याची ईमोजी पोस्ट करत आहेत.

मानसी नाईकच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, तिने २००७ साली ‘जबरदस्त’ या मराठी चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. ईटीव्ही मराठी या दूरचित्रवाहिनीवरून प्रसारित होणार्‍या ‘चार दिवस सासूचे’ या मालिकेतील मुख्य नायिकेची तिने साकारलेली भूमिका विशेष गाजली. तसेच, ‘वाट बघतोय रिक्षावाला’ आणि ‘बाई वाड्यावर या’ या गाण्यांनी तिला विशेष ओळख मिळवून दिली. मानसी अभिनयापेक्षा तिच्या नृत्य कौशल्यामुळे ओळखली जाते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘पुणेकर म्हणजे फार मोठ्ठे कलाकार!’, म्हणत सुव्रत जोशीने पुणेकर अन् ‘या’ गोष्टीचे नाते केले उघड

-‘माझं हृदय स्वीकाराल का?’, बिग बॉसच्या घरात चक्क सुरेखा कुडचींना ‘या’ व्यक्तीने केले प्रपोज

-तुटलेलं नातं पुन्हा जुळणार? ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आविष्कारने मारली स्नेहाला मिठी

हे देखील वाचा