Saturday, July 6, 2024

जोडा असावा तर असा!, मानसी नाईकने पतीसोबत व्हिडिओ शेअर करून लिहिले भन्नाट कॅप्शन

अभिनेत्री मानसी नाईक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती तिचे अनेक व्हिडिओ तसेच फोटो ती शेअर करत असते. ती तिच्या पतीसोबत देखील अनेकवेळा फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. सध्या ती चित्रपटापासून जरा दूर आहे, परंतु तरी देखील तिने तिच्या चाहत्यांना अंतर दिले नाही. ती नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अशातच तिच्या पतीसोबत तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

मानसीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून पतीसोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, ती तिचा पती प्रदीपचा हात धरून घेऊन जाते नंतर तो तिला उचलून घेतो. या व्हिडिओच्या बॅकग्राउंडला ‘सूर्यवंशी’ या चित्रपटातील ‘टिप टिप बरसा पाणी’ हे गाणे गायले आहे. व्हिडिओमध्ये मानसीने निळ्या रंगाची पैठणी घातली आहे, तर प्रदीप काळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसत आहे. (Marathi actress Manasi naik share a video with her husband on social media)

हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले आहे की, “रखकर तेरे कांधे पे सर, ताउम्र का साथ चाहती हू. अपने सारे एहसास सिर्फ, तेरे संग बिताना चाहती है.” नुकतेच मानसीच्या दिराचे लग्न झाले आहे. त्यांच्यातील मानसीचा हा लूक आहे. या मधील बाकी अनेक फोटो आणि व्हिडिओ देखील तिने शेअर केले आहेत. तिचे चाहते सातत्याने या पोस्टवर त्यांचा प्रतिक्रिया देत आहेत.

मानसी नाईकने या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात तिचा बॉयफ्रेंड प्रदीप खरेरासोबत लग्न केले. त्यांच्या लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत होते. तिचा पती प्रदीप हा एक इंटरनॅशनल बॉक्सर आहे. तसेच तो एक अभिनेता आणि मॉडेल आहे.

मानसी नाईकच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, तिने २००७ साली ‘जबरदस्त’ या मराठी चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. ईटीव्ही मराठी या दूरचित्रवाहिनीवरून प्रसारित होणार्‍या ‘चार दिवस सासूचे’ या मालिकेतील मुख्य नायिकेची तिने साकारलेली भूमिका विशेष गाजली. तसेच, ‘वाट बघतोय रिक्षावाला’ आणि ‘बाई वाड्यावर या’ या गाण्यांनी तिला विशेष ओळख मिळवून दिली. मानसी अभिनयापेक्षा तिच्या नृत्य कौशल्यामुळे ओळखली जाते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रभास अन् पुजा हेगडेचा ‘राधे श्याम’ रिलीझपूर्वीच लीक! ‘अशी’ काहीशी आहे चित्रपटाची कथा

-दहावीत असताना होती पहिली गर्लफ्रेंड, चित्रपटांप्रमाणेच रंगतदार होती कार्तिक आर्यनची लव्हलाईफ

-अरे वा! अखेर ‘देवमाणूस’चा पुढचा भाग येणार प्रेक्षकांच्या भेटीला, सोशल मीडियावर प्रोमो व्हायरल

हे देखील वाचा