Tuesday, July 9, 2024

मानसीने काळ्या रंगाच्या ड्रेसमधील ग्लॅमरस फोटो केले शेअर; पती म्हणाला, ‘मला मारण्याचा इरादा आहे का?’

मराठी चित्रपटसृष्टीत ‘आयटम गर्ल’ अशी जिची ओळख आहे, ती अभिनेत्री म्हणजे सर्वांची लाडकी मानसी नाईक. मानसी नाईक ही मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत ग्लॅमरस आणि हॉट अभिनेत्री आहे. तसेच सोशल मीडिया देखील तिचा खूप वावर असतो. सोशल मीडियावर तिचे अनेक डान्स व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असतात. तिचे चाहते देखील तिच्या या व्हिडिओला भरभरून पसंती देत असतात. अशातच तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

मानसीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहे. ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने काळ्या रंगाचा एक सुंदर ड्रेस परिधान केला आहे. तसेच ड्रेसला मॅचिंग ईअरिंग घातले आहेत. याशिवाय तिने इतर कोणतीही ज्वेलरी घातली नाही. या फोटोमध्ये तिने केस मोकळे सोडले आहेत. ती खूपच सुंदर दिसत असून वेगवेगळ्या पोझ देत आहेत. मानसीचे लग्न झाल्यानंतर तिच्या लूकमध्ये बराच बदल झाला आहे. अनेकवेळा ती तिचे पारंपारिक लूकमधील फोटो शेअर करत असते. (Marathi actress Manasi naik share her bold photos on social media)

तिचा हे फोटो पाहून तिच्या अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच या फोटोवरील एक कमेंट खूप लक्षवेधी ठरत आहे. मानसी नाईकचा पती प्रदीप खरेरा याने कमेंट केली आहे की, “एक तो तुम इतनी सुंदर उपर से ब्लॅक कलर पहनकर मुझे मारने का इरादा है क्या तुम्हारा?” तिच्या चाहत्यांना देखील तिचा हा लूक खूप आवडला आहे.

मानसी नाईकच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, तिने २००७ साली ‘जबरदस्त’ या मराठी चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. ईटीव्ही मराठी या दूरचित्रवाहिनीवरून प्रसारित होणार्‍या ‘चार दिवस सासूचे’ या मालिकेतील मुख्य नायिकेची तिने साकारलेली भूमिका विशेष गाजली. तसेच, ‘वाट बघतोय रिक्षावाला’ आणि ‘बाई वाड्यावर या’ या गाण्यांनी तिला विशेष ओळख मिळवून दिली. मानसी अभिनयापेक्षा तिच्या नृत्य कौशल्यामुळे ओळखली जाते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-गुलाबी रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये अन्विता दिसतेय एकदम ‘बार्बी डॉल’, कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव

-अभिज्ञा भावेचे स्टायलिश कॉर्पोरेट लूकमधील फोटो व्हायरल, पाहून तुम्हीही म्हणाल, ‘भारीच की!’

-गुलाबी साडी नेसून आर्चीने घेतली ‘मिरर सेल्फी’; चाहत्यांना भावतोय अभिनेत्रीचा सोज्वळ अंदाज

हे देखील वाचा