Saturday, July 6, 2024

मानसी नाईकने केला नवीन फोटो शेअर; चाहत्यांच्या सोडा, अभिनेत्रीच्या पतीच्या कमेंटने मिळवली ‘वाहवा’

अभिनेत्री मानसी नाईक हिचा समावेश मराठी चित्रपटसृष्टीतील हॉट आणि ग्लॅमरस अभिनेत्रींच्या यादीत होतो. अभिनयासोबत तिने डान्सची कला देखील जोपासली आहे. तिच्या डान्सची झलक आपण सर्वांनी पाहिलीच आहे. तिने मराठीमध्ये अनेक गाण्यांवर डान्स केला आहे. मानसी आजकाल सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे डान्स व्हिडिओ तसेच फोटो देखील ती वारंवार सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

मानसीने अलीकडेच अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने डेनिमचा निळ्या रंगाचा शर्ट आणि जिन्स घातली आहे. तिने कानात रिंग्स घातलेले दिसत आहे. तसेच लाल रंगाची लिपस्टिक लावून मेकअप केला आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. (Marathi actress Manasi naik share her glamorous photos on social media)

तिने हा फोटो शेअर करून लिहिले आहे की, “तुमची डेनिम स्टोरी काय आहे?” यावर तिचा पती प्रदीप खरेरा याने कमेंट केली आहे की, “माझ्या पत्नीसोबत फोटो काढणे ही माझी डेनिम स्टोरी आहे.” तसेच तिचे इतर चाहते देखील या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. लग्न झाल्यानंतर मानसी अनेकवेळा पारंपरिक लूकमध्ये दिसली आहे. क्वचितच तिचे मॉर्डन लूकमधील फोटो पाहायला मिळतात.

मानसी नाईकच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, तिने २००७ साली ‘जबरदस्त’ या मराठी चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. ईटीव्ही मराठी या दूरचित्रवाहिनीवरून प्रसारित होणार्‍या ‘चार दिवस सासूचे’ या मालिकेतील मुख्य नायिकेची तिने साकारलेली भूमिका विशेष गाजली. तसेच, ‘वाट बघतोय रिक्षावाला’ आणि ‘बाई वाड्यावर या’ या गाण्यांनी तिला विशेष ओळख मिळवून दिली. मानसी अभिनयापेक्षा तिच्या नृत्य कौशल्यामुळे ओळखली जाते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-श्रुती मराठेच्या डॅशिंग लूकमधील फोटोने वेधले चाहत्यांचे लक्ष; कुणाला आवडला ड्रेस, तर कुणाला तिचा लूक

-गौतमी देशपांडेच्या ऑफ शोल्डर ड्रेसमधील फोटोने अमृता खानविलकरलाही घातली भुरळ; कमेंट करत म्हणाली…

-‘माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही माझ्यासाठी…’, म्हणत भरत जाधवने दिल्या महेश कोठारेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

हे देखील वाचा