मराठी सिनेसृष्टीत आपल्या नृत्यकेलेने प्रेक्षकांना वेड लावणारी मानसी नाईक तर आपणा सर्वांना ठाऊकच आहे. एकापेक्षा एक भन्नाट गाण्यांवर डान्स करून तिने प्रेक्षकांच्या मनात आपली छाप सोडली आहे. आपल्या मनमोहक अदांनी रसिकांना घायाळ करणारी ही अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. एकापेक्षा एक जबरदस्त फोटो आणि व्हिडिओ शेअर करून, ती नेहमीच चर्चेचा विषय बनते.
अलीकडेच मानसीने पोस्ट केलेला एक व्हिडिओ, चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. यामधील अभिनेत्रीच्या मनमोहक अदा कोणालाही वेड लावायला पुरेश्या आहेत. यात तिचे दोन रूप पाहायला मिळत आहेत. पहिल्यांदा मानसीने लाल रंगाचा ड्रेस घातला आहे. सोबतच घातलेले कानातले आणि गळ्यातील मंगळसूत्र तिच्या सौंदर्यात आणखी भर घालत आहेत. त्यानंतर ती एका नाईट ड्रेसमध्ये दिसते.
‘याद पिया की आने लगी’ या प्रसिद्ध गाण्यावरील मानसीचा अभिनय नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “ख्वाब टूटते है मगर हौंसले जिंदा है. हम वो है जहाँ मुश्किले शर्मिंदा है.” व्हिडिओ सोबतच हे खास कॅप्शन युजर्सचे लक्ष वेधून घेत आहे.
मानसी नाईकने २००७ साली ‘जबरदस्त’ या मराठी चित्रपटाद्वारे चित्रपट क्षेत्रात प्रवेश केला होता. ईटीव्ही मराठी या दूरचित्रवाहिनीवरून प्रसारित होणार्या ‘चार दिवस सासूचे’ या मालिकेतील मुख्य नायिकेची तिने साकारलेली भूमिका विशेष गाजली. तसेच, ‘वाट बघतोय रिक्षावाला’ आणि ‘बाई वाड्यावर या’ या गीतांनी तिला विशेष ओळख मिळवून दिली.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…