Tuesday, April 8, 2025
Home मराठी ‘सावरतेय, वाढतेय आणि चमकतेय’, मानसी नाईकची ‘ती’ पोस्ट झाली व्हायरल

‘सावरतेय, वाढतेय आणि चमकतेय’, मानसी नाईकची ‘ती’ पोस्ट झाली व्हायरल

मराठी सिनेसृष्टीतील अतिशय उत्तम डान्सर आणि उत्तम अभिनेत्री देखील आहे. मानसी नेहमीच तिच्या नृत्य कलेने सर्वानाच लक्ष वेढून घेत असते. मानसी तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे देखील मोठ्या प्रमाणावर लाईमलाइट मध्ये येत असते. मात्र सध्या मानसी तिच्या घटस्फोटाच्या निर्णयामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. वर्षभरापूर्वी अतिशय थाटामाटात मानसीने बॉक्सर प्रदीप खरेरासोबत लग्न केले. त्यानंतर त्या दोघांचे एकत्र अनेक फोटो, व्हिडिओ आणि इंस्टाग्रामवरील रिल्स तुफान व्हायरल झाले. याशिवाय मराठी शोमध्ये देखील मानसी आणि प्रदीप एकत्र दिसले. असे असूनही अचानक मानसीने तिच्या इंस्टाग्रामवरून तिचे आणि प्रदीपचे सर्व फोटो काढून टाकले आणि घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले. त्यानंतर खुद्द मानसीनेच ती प्रदीपसोबत घटस्फोट घेणार असून, तिने त्यासाठी अर्ज देखील केला असल्याचे स्पष्ट केले.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Manasi Naik (@manasinaik0302)

यानंतर मानसीने आणि प्रदीपने एकमेकांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. यातच मानसीने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहे. या फोटोंसोबतच तिने जे कॅप्शन शेअर केले आहे ते खूप काही बोलून जाते. ‘अजूनही… मी आतापर्यंत घेतलेला हा सर्वात चांगला निर्णय. तुमचे आणि तुमच्या शांततेचे संरक्षण करा. या जगाचे आभार. मी कधीच हार पत्करणार नाही. सावरतेय, वाढतेय आणि चमकतेय!’ यासोबत मानसीने तिचे काही सुंदर फोटो देखील शेअर केले आहेत. ज्यात तिने लाल रंगाचा टॉप घातलेला दिसत आहे. मानसीने शेअर केलेली ही पोस्ट तिच्या घटस्फोटाच्या निर्णयाशी जोडली जात आहे. तिने यात थेट कुठेच तसे लिहिले नसले तरी अप्रत्यक्षरीत्या ती त्याबद्दलच बोलत असल्याचा अंदाज नेटकरी लावत आहे.

मानसीबद्दल सांगायचे झाले तर, तिला ‘बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर’ या गाण्यांमधून अमाप लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली. याशिवाय मानसीने अनेक चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दिग्गज अभिनेते सतीश शाह यांच्यावर झाली वर्णभेदावरून कमेंट, दिले सणसणीत उत्तर
इंजिनिअरिंग सोडून ‘या’ कलाकारांनी अभिनयात आजमावले नशिब, आज आहेत बॉलिवूडचे स्टार

 

हे देखील वाचा