Tuesday, July 9, 2024

नुसता जाळ अन् धूर! ‘लाल परी’ मानसी नाईकचा नवीन लूक पाहून चाहत्याला भावना अनावर

अभिनेत्री मानसी नाईक हिचा समावेश मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत हॉट आणि बोल्ड अभिनेत्रींच्या यादीत होतो. अभिनयासोबत तिने डान्सची कला देखील जोपासली आहे. तिच्या डान्सची झलक आपण सर्वांनी पाहिलीच आहे. तिने मराठीमध्ये अनेक गाण्यांवर डान्स केला आहे. मानसी आजकाल सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे डान्स व्हिडिओ तसेच फोटो देखील ती वारंवार सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

मानसीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले असून, या फोटोमध्ये तिने साजशृंगार केला आहे. फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने लाल रंगाची साडी नेसली असून त्यावर तिने सोनेरी रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज घातला आहे. यासोबत हातात लाल रंगाचा चुडा, गळ्यात मंगळसूत्र तसेच आणखी काही ज्वेलरी घातली आहे. तिच्या या लूकवर तिचे हे मोकळे केस अधिकच खुलून येत आहे. या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. (Marathi actress Manasi naik’s new photo viral on social media)

मानसीने शेअर केलेला हा फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. अनेकजण या फोटोवर कमेंट करून तिच्या या लूकचे कौतुक करत आहेत. तिच्या एका चाहत्याने या फोटोवर कमेंट केली आहे की, “नुसता जाळ आणि धूर.” तसेच अनेकजण या फोटोवर हार्ट ईमोजी पोस्ट करत आहेत.

मानसी नाईकच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, तिने २००७ साली ‘जबरदस्त’ या मराठी चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. ईटीव्ही मराठी या दूरचित्रवाहिनीवरून प्रसारित होणार्‍या ‘चार दिवस सासूचे’ या मालिकेत तिने साकारलेली मुख्य नायिकेची भूमिका विशेष गाजली. तसेच, ‘वाट बघतोय रिक्षावाला’ आणि ‘बाई वाड्यावर या’ या गाण्यांनी तिला विशेष ओळख मिळवून दिली. मानसी अभिनयापेक्षा तिच्या नृत्य कौशल्यामुळे ओळखली जाते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘स्पष्ट वय दिसतेय!’ म्हणून ट्रोल करणाऱ्याला सोनालीचा जोरदार पंच, म्हणाली…

-कोव्हिडमधून बरे झाल्यानंतर ‘अशी’ झाली होती रुबीनाची हालत; म्हणाली, ‘मी पुन्हा ५० किलो वजन…’

-नेहा कक्कर आहे गरोदर? ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये देणार गोड बातमी

हे देखील वाचा