Wednesday, June 26, 2024

मनवा नाईकचा धक्कादायक खुलासा! कार चालकाने दिली धमकी, ‘थांब तुला दाखवतोच’

मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत दिग्दर्श, निर्माता आणि कलाकार म्हणून ओळखली जाणारी मनवा नाईक. इंडट्रीमध्ये हिला ब्युटी विद ब्रेन म्हणून ओळखले जाते. तिने अनेक चित्रपटात आपली दमदार अदाकारी दाखवली आहे. ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिचा सोशल माडियावर मोठा चाहतावर्ग आहे. तिने नुकतंच एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिच्यासोबत धक्का प्रसंग घडल्याची माहिता दिली आहे.

तिच्यासोबत एक असा धक्कादायक प्रसंग घडला आहे, जे सगळ्यांनाच सांगने गरजेचे होते असे मनवा नाईकने सांगत तिच्यासोबत घडलेला किस्सा सांगितला आहे. तिने आपल्या अधिृकत फेसबुक अकाउंवर एका गाडी चालकाचा आणि गाडीचा नंबर प्लेटचा फोटो शेअर केला आहे. सोबतच घडलेला धक्कादायक प्रसंग सांगत लिहिले की, “मी रात्री 8:15 च्या सुमारास उबर बुक केली होती, तेवा त्या गाडी चालकाने वांद्रा-कुर्ला संकुलनात पोहोचल्यावर त्याने फोनवर बोलणयाला सुरु केले, तेव्हा मी त्याला सांगितले की, फोनवर बोलू नकोस असं सांगितलं, पण त्याने ऐकलं नाही. यानंतर त्याने बीकेसी मध्ये सिग्नल तोडला, तेव्हाही मी त्याला बजावून सांगितले होते की, असे करु नकोस, मात्र त्याने माझ्या बोलण्याकडे कानाडोळा केला, त्याने माझा एकही शब्द ऐकला नाही.”

मनवा नाईकने पुढे लिहिले की, “पुढे गेल्यानंतर त्याला ट्रॅफिक पोलीसांनीही त्याला अडवले होते, पण त्याने त्यांच्यासोबतही वाद घातला आणि त्याच्या गाडीचा आणि त्याचा फोटो काढून घेतला. मीही त्याचे फोटो काढून घेतले आणि पोलीसांची समजत काढली की, एवढ्या वेळेस जाऊद्या. मात्र, त्या गाडीचालकालाही जाम राग आलेला दिसून येत होता. मग तु 500 रुपये भरणार आहेस का ? असं त्याने मला संतापून विचारलं, मग मी त्याला म्हमले की, तु स्वत: फोनवर बोलत होतास. मग तो पुन्हा रागाने गाडी चालवू लागला आणि त्याने मला धमकावून सांगितले की, थांब तुला दाखवतोच. यानंतर मी त्याला सांगितले की, गाडी पोलीस स्टेशनकडे वळव असे सांगितले, तेव्हा त्याने बीकेसीमधील जिओ गार्डनपरिसरात गडद अंधार असणाऱ्या ठिकाणी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. मी पुन्हा त्याला ओरडून सांगितलं की, गाडी पोलिस्टेशकडे घे. त्याने पूर्ण रस्त्यामध्ये माझ्याशी वाद घातला.त्याने खूप वेगाने गाडी पळवली. त्याने पुन्हा एकदा कुर्ला संकलाच्या परिसरात गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. काय करणार? थांब तुला दाखवतोच आता, अशी धमकी त्याने मला दिली. मी खूप घाबरले आणि उबर सेफ्टीला फोन केला. मी उबर सेवा केंद्राशी बोलत असतानाही तो भर वेगाने गाडी चालवत होता. हे सगळं घडत असताना गाडी चुना भट्टी रोडवरील प्रियदर्शीनी पार्कपशी पोहोचली होती. तेव्हा मी त्याला गाडी थांबव म्हणले असूनही त्याने गाडी थांबवली नाही. त्याने त्याच्या फोनवरुन कोणालातरी फोन केला मग मी जाम घाबरले आणि ओरडू लागले. तेव्हा बाजूने दोन दुचाकी आणि एका रिक्षा चालकाने माझा आवाज ऐकला आणि मला त्या उबरमधून बाहेर काढले. मी आता सुरक्षित आहे. मात्र, अशा प्रसंगामुळे मी खूपच घाबरली आहे,” असे मनवाने सांगितले.

असे कोणासोबत पुन्हा एकदा घडू नये, त्यामुळे कोणतीही ओला, उबर बुक करण्याआगोदर दहा वेळेस विचार करुन आणि गाडी चालकाला पाहून त्या गाडीमध्ये प्रवास करावा. त्यामुळे तिने हा भयंकर अनुभव सगळ्यांना सांगितला आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
‘लेक जान्हवीची श्रीदेवीशी तुलना करणे योग्य नाही’, बाेनी कपूरची लाेकांना खास विनंती
आत्म’हत्या करणाऱ्या अभिनेत्रीचा अखेरचा व्हिडिओ व्हायरल; म्हणाली, ‘मी तुझ्यासाठी जीव पण…’

हे देखील वाचा