Sunday, August 3, 2025
Home मराठी अभिनेत्री मयुरी देशमुखने इंस्टाग्रामवर फॉलोवर्स केला मोठा टप्पा पार, पोस्ट शेअर करत मानले फॅन्सचे आभार

अभिनेत्री मयुरी देशमुखने इंस्टाग्रामवर फॉलोवर्स केला मोठा टप्पा पार, पोस्ट शेअर करत मानले फॅन्सचे आभार

स्टार प्लस या चॅनेलवरील ‘इमली’ या मालिकेतून सध्या रसिकांचे मनोरंजन करणारी मयुरी देशमुख चांगलीच चर्चेत असते. मालिकेत सुरुवातीला मुख्य भूमिकेत वाटणारी मयुरी कधी या मालिकेत खलनायिका झाली हे समजलेच नाही. तसे पाहायला गेले तर मयुरीने या आधी मराठीमध्ये देखील काम केले आहे. मयुरी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. आजकाल तर सगळेच सोशल मीडिया वापरतात. आपली प्रत्येक गोष्ट, भाव-भावना समोरच्यापर्यंत पोहचवण्याचे सोशल मीडिया हे एक प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे प्रत्येकजण या गोष्टीचा पुरेपूर फायदा घेत असतो. त्यात कलाकार म्हटल्यावर तर ते त्यांची प्रत्येक अपडेट प्रेक्षकांना देत असतात. अशातच सोशल मीडियाच्या बाबतीत मयुरीने एक गोड बातमी तिच्या फॉलोवर्ससाठी शेअर केली आहे.

मयुरीचे इंस्टाग्रामवर नुकतेच ७ लाख फॉलोवर्स पूर्ण झाले आहेत. यानिमित्त तिने एक पोस्ट शेअर करून सगळ्यांचे आभार मानले आहे. तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने गुलाबी रंगाची साडी आणि लाल रंगाचे स्लीव्हलेस ब्लाऊज घातला असून, तसेच केसांची वेणी घालून सुंदर ईअरिंग घातलेले दिसत आहेत. फोटोमध्ये ती नेहमीप्रमाणेच खूप सुंदर दिसत आहे. (Marathi actress mayuri Deshmukh complete her 700 k followers, she is grateful while sharing post)

हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “सात लाख लोकांचे प्रेम, खूप आभारी आहे.” तिने शेअर केलेल्या या फोटोवर अनेक चाहते त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकजण तिचे अभिनंदन करत आहेत.

मयुरीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेत काम केले आहे. या मालिकेतील तिची मानसी नावाची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. या मालिकेत तिच्यासोबत अभिज्ञा भावे होती. तसेच तिने ‘डॉक्टर प्रकाश बाबा आमटे’, ‘३१ दिवस’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच लवकरच ती सिद्धार्थ जाधवसोबत ‘लग्नकल्लोळ’ या चित्रपटात दिसणार आहे.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-उफ्फ ब्यूटी! तेजस्विनीच्या स्टायलिश लूकने इंटरनेटवर लावली आग, बेडवर बसून देतेय फोटोसाठी पोझ

-शाहरुख खान पुन्हा एकदा दिसणार ‘डबल रोल’मध्ये? जाणून घ्या काय आहे आगामी चित्रपटाची कथा

-उर्वशी रौतेलालाही मिळाला दुबईचा गोल्डन व्हिसा, फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद

हे देखील वाचा