मराठी टेलिव्हिजनवर तसेच चित्रपटसृष्टीत अनेक भूमिका निभावून लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे मयुरी देशमुख होय. मयुरी देशमुखने झी मराठीवरील ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेत काम केले आहे. या मालिकेतील तिचा अभिनय सर्वांना खूप आवडला होता. तिच्या निरागस हास्याने आणि स्वभावाने सर्वांनाच वेड लावले होते. या मालिकेत तिच्यासोबत अभिज्ञा भावे होती. या मालिकेची कहाणी देखील सर्वांनाच आवडली होती. संपूर्ण देश आज रविवारी (१५ ऑगस्ट ) ७५ वा स्वातंत्रदिन साजरा करत आहे. यानिमित्त अनेक कलाकार शुभेच्छा देत आहेत. अशातच मयुरीने देखील सोशल मीडियावर फोटो शेअर करून सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मयुरी देशमुखने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. या फोटोमध्ये ती नदीच्या कडेला एका पुलावर बसलेली दिसत आहे. ती एका शांत आणि निवांत ठिकाणी बसलेली दिसत आहे. तिने हे ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.” यासोबत तिने केसरी, पांढऱ्या आणि हिरव्या रंगाची हार्ट ईमोजी पोस्ट केली आहे. तिचे अनेक चाहते देखील तिच्या या फोटोवर कमेंट करून तिला देखील स्वातंत्रदिनाच्या शुभेच्छा येत आहेत. (marathi actress mayuri deshmukh give wishesh on independence day)
मयुरीने अवघ्या मोजक्याच चित्रपटात काम केले आहे, पण तिने त्यातून प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे. तिने मराठीमध्ये ‘३१ दिवस’ आणि ‘डॉक्टर प्रकाश बाबा आमटे’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच ती सध्या स्टार प्लस या चॅनेलवरील ‘इमली’ या मालिकेत काम करत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-ही आहे हॉलिवूडमधील सर्वाधिक श्रीमंत कलाकारमंडळी, संपत्तीचा आकडा पाहून तुम्हीही व्हाल दंग