Tuesday, July 9, 2024

‘सौंदर्याचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत’, मराठमोळ्या मयुरी देशमुखचे सुंदर फोटो पाहून चाहताही घायाळ

स्टार प्लस या चॅनेलवरील ‘इमली’ या मालिकेतून सध्या रसिकांचे मनोरंजन करणारी मयुरी देशमुख चांगलीच चर्चेत असते. मालिकेत सुरुवातीला मुख्य भूमिकेत वाटणारी मयुरी कधी या मालिकेत खलनायिका झाली हे समजलेच नाही. तसे पाहायला गेले, तर मयुरीने या आधी मराठीमध्ये देखील काम केले आहे. मयुरी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असणाऱ्या युजर्सपैकी एक आहे. आजकाल तर सगळेच सोशल मीडिया वापरतात. आपली प्रत्येक गोष्ट, भाव-भावना समोरच्यापर्यंत पोहोचवण्याचे सोशल मीडिया हे एक प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे प्रत्येकजण या गोष्टीचा पुरेपूर फायदा घेत असतो. त्यात कलाकार म्हटल्यावर तर ते त्यांची प्रत्येक अपडेट प्रेक्षकांना देत असतात. अशातच तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

मयुरीने सोशल मीडियावर तिचे काही गोड फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपल्याला तिचा सोज्वळ अंदाज पाहायला मिळत आहे. तिने बागेत हे फोटो काढलेले दिसत आहे. तिने गुलाबी रंगाचा टॉप आणि लाल रंगाची लेगिंज परिधान केली आहे. तसेच तिने गळ्यात एक नेकलेस आणि ईअरिंग घातले आहेत. तसेच पायात लाल रंगाची मोझडी घातली आहे. या फोटोमध्ये तिने केस कुरळे केले आहेत. या लूकमध्ये ती अगदी सुंदर आणि सोज्वळ दिसत आहे. (Marathi actress mayuri Deshmukh share her photos on social media)

हे फोटो शेअर करून मयुरीने “सजदा,” असे कॅप्शन दिले आहे. तिचा हा लूक पाहून तिच्या एका चाहत्याने “स्वप्न सुंदरी,” अशी कमेंट केली आहे. तसेच आणखी एकाने “सौंदर्याचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत,” अशी कमेंट केली आहे. चाहते सातत्याने या फोटोवर कमेंट करून तिचे कौतुक करत आहेत.

मयुरीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेत काम केले आहे. या मालिकेतील तिची मानसी नावाची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. या मालिकेत तिच्यासोबत अभिज्ञा भावे होती. तसेच तिने ‘डॉक्टर प्रकाश बाबा आमटे’, ‘३१ दिवस’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच लवकरच ती सिद्धार्थ जाधवसोबत ‘लग्नकल्लोळ’ या चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-रिंकूने आपल्या कुत्र्यासोबत मस्ती करतानाचा व्हिडिओ केला शेअर; तुम्हालाही आवडेल अभिनेत्रीचं ‘प्राणीप्रेम’

-आनंद गगनात मावेना! तब्बल ‘इतके’ फॉलोव्हर्स पूर्ण झाल्याच्या आनंदात ऋताने शेअर केली खास पोस्ट

-‘सफर खूबसूरत है, मंजिल से भी…’, म्हणत पाठक बाईंनी साडीमध्ये दाखवला दिलकश अंदाज

हे देखील वाचा