Saturday, August 2, 2025
Home मराठी मयुरी देशमुखच्या नव्या लूकने वेधले चाहत्यांचे मन; काळ्या डॉटेड पोल्कोमधील फोटो झाला व्हायरल

मयुरी देशमुखच्या नव्या लूकने वेधले चाहत्यांचे मन; काळ्या डॉटेड पोल्कोमधील फोटो झाला व्हायरल

कलाकार त्यांच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांत तसेच मालिकांमध्ये काम करतात. पण त्यांच्या करिअरमध्ये एखादी अशी मालिका किंवा चित्रपट येतो आणि त्याने कलाकारांना इतकी ओळख मिळते की, ते आयुष्यभरासाठी ती मालिका त्यांच्या नावी होऊन जाते. अशीच झी मराठीवरील एक गाजलेली मालिका म्हणजे ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेत मुख्य भूमिकेत असणारी अभिनेत्री म्हणजे मयुरी देशमुख. तसं पाहायला गेलं तर या आधी मयुरीने इतर मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. पण या मालिकेतील तिचे पात्र आणि अभिनय प्रेक्षकांना खास पसंत पडला होता. तिच्या मानसी नावाच्या पात्राने प्रेक्षकांना भुरळ घातली होती. त्यात तिचा तो निरागस चेहरा आणि गोड स्माईल यामुळे तर ती सर्वांचे आकर्षण बनली होती. आजही प्रेक्षकांमध्ये तिची तेवढीच क्रेझ आहे. अशातच तिने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

मयुरीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती फारच सुंदर दिसत आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने काळ्या रंगाचा पोल्का डॉटेड ड्रेस परिधान केला आहे. ती या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये खूपच मनमोहक दिसत आहे. तिने यामध्ये कोणताही ज्वेलरी घातली नाही, तसेच तिने अगदी हलकासा मेकअप केला आहे. तसेच मिडल पार्टेशन करून तिने केस मोकळे सोडले आहेत.

तिचे अनेक चाहते या फोटोवर कमेंट करत आहेत. यातच मयुरीची जवळची मैत्रीण आणि अभिनेत्री अभिज्ञा भावे हिने ‘माईन’ असे लिहून कमेंट केली आहे. अभिज्ञा भावेने मयुरीसोबत ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेत तिच्या मोठ्या बहिणीचे पात्र निभावले होते. (marathi actress mayuri deshpande share her black polco dress photos on social media)

मयुरीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेत काम केले आहे. तसेच तिने ‘डॉक्टर प्रकाश बाबा आमटे’, ‘३१ दिवस’ या चित्रपटात काम केले आहे. ती सध्या स्टार प्लस या वाहिनीवरील
‘इमली’ या मालिकेत काम करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आता होणार धमाल! प्रेक्षकांचे मनोरंजन करायला ‘या’ पाच मालिका सज्ज; लवकरच झी मराठीवर मारणार दणक्यात एंट्री

-अथिया शेट्टीच्या पोस्टवर अनुष्काने ‘त्या’ गोष्टीवर निशाणा साधत केली भन्नाट कमेंट

-शिवानी सोनारला वाढदिवसाच्या आधीच मिळाले ‘हे’ गिफ्ट, पाहून तुम्हीही कराल अभिनंदन

हे देखील वाचा