Tuesday, July 9, 2024

‘टॅटू काढायला नाही भीती वाटत…’ लस घेताना घाबरल्यामुळे नेटकऱ्यांनी मिताली मयेकरला केले ट्रोल

अभिनेत्री मिताली मयेकर ही तिच्या लूक्समुळे नेहमीच चर्चेत असते. तिचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. तिची फॅन फॉलोविंग देखील भरपूर असल्याने तिचे चाहते देखील तिच्या फोटोला भरभरून प्रतिसाद देत असतात. त्याचा फॅशन सेन्स आपण सगळ्यांनी पाहिलाच आहे. अशातच तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी तिला जोरदार ट्रोल केले आहे.

मितालीने नुकतेच काही दिवसांपूर्वी कोरोना लस घेतली आहे. लस घेताना तिने व्हिडिओ काढून सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ती खूप घाबरलेली दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावरून आणि देहबोलीवरून ती घाबरलेली स्पष्ट दिसत आहे. लस देणारी नर्स तिला समजावताना दिसते मग नंतर ती डोळ्यांवर हात ठेवून लस घेते. याच वेळी तिच्या हातावरील टॅटू स्पष्ट दिसत आहेत. यामुळे नेटकरी तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करत आहेत. (marathi actress mitali mayekar get troll for scared of taking vaccine)

तिच्या या व्हिडिओवर तिच्या एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “टॅटू काढायला नाही भीती वाटली आणि लस घ्यायला घाबरतेस.” तसेच बाकी अनेकजण या व्हिडिओवर हसण्याची इमोजी पोस्ट करत आहेत. तर आणखी एकाने “खूपच जास्त ओव्हर ऍक्टिंग” अशी कमेंट केली आहे. यासोबत अनेकजण या व्हिडिओवर कमेंट करत आहेत.

मितालीने या वर्षाच्या सुरुवातीला तिचा बॉयफ्रेंड सिद्धार्थ चांदेकर याच्याशी विवाह केला आहे. त्यांनी अगदी पारंपारिक पद्धतीने विवाह केला आहे. त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

मिताली मयेकरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘उर्फी’, ‘फ्रेशर्स’, ‘यारी दोस्ती’, ‘बिल्लू’, ‘आम्ही बेफिकीर’, ‘घेतला वसा टाकू नको’ अशा चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच तिने काही दिवसांपूर्वी झी मराठीवरील ‘लाडाची गं लेक मी’ या मालिकेत मुख्य भूमिकेत काम केले आहे.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-उफ्फ ब्यूटी! तेजस्विनीच्या स्टायलिश लूकने इंटरनेटवर लावली आग, बेडवर बसून देतेय फोटोसाठी पोझ

-शाहरुख खान पुन्हा एकदा दिसणार ‘डबल रोल’मध्ये? जाणून घ्या काय आहे आगामी चित्रपटाची कथा

-उर्वशी रौतेलालाही मिळाला दुबईचा गोल्डन व्हिसा, फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद

हे देखील वाचा