Monday, July 8, 2024

‘अगं किती गोड दिसत आहेस तू’, म्हणत मिताली मयेकरच्या सुंदर हास्यावर भाळले नेटकरी

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक अभिनेत्री आहेत. त्यांनी आपली ओळख निर्माण करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. तसेच यासाठी त्यांना खूप काळ लागला आहे. परंतु अगदी कमी कालावधीत आपलं नाव कमावणाऱ्या अभिनेत्री अगदी हाताच्या बोटांवर मोजण्या इतक्या आहेत. यातीलच एक नाव म्हणजे अभिनेत्री मिताली मयेकर. मितालीने चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करून काही जास्त काळ लोटला नाही, पण तरी देखील आज ती खूप लोकप्रिय आणि प्रसिद्ध आहे. अवघ्या २४ वर्षांच्या मितालीने तिची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. ती सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. अशातच तिच्या चाहत्यांसाठी तिने नुकताच एक फोटो शेअर केला आहे.

मितालीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती नेहमी प्रमाणेच खूप सुंदर दिसत आहे. तिने ब्लॅक एँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने साडी नेसलेली दिसत आहे. तसेच गळ्यात मंगळसूत्र, ठुशी, कानात झुमके, नाकात नथ असा सगळा साजशृंगार केला आहे. या फोटोमधील तिची स्माईल चाहत्यांना खास आकर्षित करत आहे. ती खूपच सुंदर आणि निरागस दिसत आहे. (Marathi actress mitali mayekar share her beautiful photos on social media)

मितालीने शेअर केलेल्या या फोटोवर तिच्या चाहत्यांच्या प्रतिक्रया उमटत आहेत. कोणी तिला ‘परम सुंदरी’ म्हणत आहे, तर कोणी ‘ब्युटीफुल’ म्हणत आहेत. तसेच तिच्या एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “अगं किती गोड दिसत आहेस तू.” आणखी एकाने “किती गोड हसतेस तू,” अशी कमेंट केली आहे.

मिताली मयेकरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘उर्फी’, ‘फ्रेशर्स’, ‘यारी दोस्ती’, ‘बिल्लू’, ‘आम्ही बेफिकीर’, ‘घेतला वसा टाकू नको’ अशा चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच तिने काही दिवसांपूर्वी झी मराठीवरील ‘लाडाची गं लेक मी’ या मालिकेत मुख्य भूमिकेत काम केले आहे. तिने याच वर्षी तिचा बॉयफ्रेंड सिद्धार्थ चांदेकर याच्याशी लग्न केले आहे. तो देखील एक अभिनेता आहे. तो सध्या स्टार प्रवाहावरील ‘सांग तू आहेस ना’ या मालिकेत काम करत आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘…मला हार्ट अटॅक येईल’, म्हणत चाहत्यांनी दिल्या अक्षया देवधरच्या मराठमोळ्या लूकवर एकापेक्षा एक प्रतिक्रिया

-‘उफ्फ तेरी ये अदा’, मिथिला पालकरच्या नवीन फोटोने घातला सोशल मीडियावर धुमाकूळ

-‘खतरनाक…’, बिकिनीमधील अनन्याची घायाळ करणारी अदा पाहून, उमटतायेत चाहत्यांच्या प्रतिक्रिया

हे देखील वाचा