Wednesday, July 3, 2024

मिताली मयेकरचे फोटो पाहून चाहत्याने केली थेट नॅशनल क्रशसोबत तुलना, म्हणाला…

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक अभिनेत्री आहेत. ज्यांनी आपली ओळख निर्माण करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. यासाठी त्यांना खूप काळ लागला. परंतु, अगदी कमी कालावधीत आपलं नाव कमावणाऱ्या अभिनेत्री अगदी हाताच्या बोटांवर मोजण्या इतक्या आहेत. यातीलच एक नाव म्हणजे अभिनेत्री मिताली मयेकर. मितालीने चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करून काही जास्त काळ लोटला नाही, पण तरी देखील आज ती खूप लोकप्रिय आणि प्रसिद्ध आहे. अवघ्या २४ वर्षाच्या मितालीने तिची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. ती सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. अशातच तिच्या चाहत्यांसाठी तिने नुकताच एक फोटो शेअर केला आहे. जो सध्या जोरदार चर्चेत आहे.

मितालीने अलीकडेच सोशल मीडियावर तिचे काही साडीमधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती नेहमी प्रमाणेच फार सुंदर दिसत आहे. या फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाची सोनेरी काठ असलेली साडी नेसून त्यावर सोनेरी रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज घातले असून, यावर तिने कानात छोटेसे सोनेरी रंगाचे झुमके घातलेले दिसत आहेत. तसेच केस मागे बांधून कपाळी छोटीसी टिकली लावली आहे. या फोटोमध्ये ती अगदी साधी पण तितकीच सुंदर दिसत आहे. (Marathi actress mitali mayekar share her saree look photos on social media)

हा फोटो शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “ड्रेसिंग हा माझा आवडता खेळ आहे.” तिने शेअर केलेल्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडत आहे. तिचा हा फोटो तिच्या चाहत्यांना तर आवडलाच आहे यासोबत काही कलाकारांनी देखील या फोटोला त्यांची पसंती दर्शवली आहे. या फोटोवर अभिनेत्री अभिज्ञा भावे हिने “डिवाईन” अशी कमेंट केली आहे. तर रश्मी अनपट हिने हार्ट ईमोजी स्वरूपात तिच्या या लूकचे कौतुक केले आहे. फोटोला आतापर्यंत २५ हजारापेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहेत. तिच्या एका चाहत्याने या फोटोवर कमेंट केली आहे की, “हाय आमच्या मराठी इंडस्ट्रीची रश्मिका मंदाना.” तसेच बाकी अनेक या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.

मिताली मयेकरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘उर्फी’, ‘फ्रेशर्स’, ‘यारी दोस्ती’, ‘बिल्लू’, ‘आम्ही बेफिकीर’, ‘घेतला वसा टाकू नको’ अशा चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच तिने काही दिवसांपूर्वी झी मराठीवरील ‘लाडाची गं लेक मी’ या मालिकेत मुख्य भूमिकेत काम केले आहे. तिने याच वर्षी तिचा बॉयफ्रेंड सिद्धार्थ चांदेकर याच्याशी लग्न केले आहे. तो देखील एक अभिनेता आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-यंदा कर्तव्य आहे! रणबीर आणि आलिया अडकणार लग्नबंधनात; इटलीत घेणार सात फेरे?

-अभिनेत्री नेहा शर्माच्या फोटोसोबत करण्यात आली होती अश्लील छेडछाड, तिनेही फोटो शेअर करत घेतला समाचार

-अंदमानातील सेल्युलर जेलला भेट देताना स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल गौरवोद्गार काढत कंगना म्हणाली…

हे देखील वाचा