Wednesday, December 3, 2025
Home मराठी ‘मेरी प्यारी सखी’, म्हणत मराठमोळी अभिनेत्री मिताली मयेकरने केला मेहंदी रंगाच्या साडीतील फोटो शेअर

‘मेरी प्यारी सखी’, म्हणत मराठमोळी अभिनेत्री मिताली मयेकरने केला मेहंदी रंगाच्या साडीतील फोटो शेअर

आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने सर्वांच्या मनावर राज्य करणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे मिताली मयेकर. मिताली मयेकर देखील इतर अभिनेत्रींप्रमाणे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती तिचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. ती तिचा पती सिद्धार्थ चांदेकर याच्या सोबतच देखील फोटो शेअर करत असते. त्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. नुकताच तिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. जो सध्या व्हायरल होत आहे.

मिताली मयेकरने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. ज्या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने मेहंदी रंगाची साडी परिधान केली आहे. त्या साडीला‌ निळ्या रंगाची बॉर्डर आहे. तसेच निळ्या रंगाचा ब्लाऊझ परिधान केला आहे. तसेच हातात निळ्या रंगाच्या बांगड्या आणि कानात निळ्या रंगाचे कानातले घातले आहे. तिने नाकात नथही घातली आहे. त्यामुळे ती खूपच आकर्षक दिसत आहे. हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “मेरी प्यारी सखी.”

https://www.instagram.com/p/CPpg8b6p15r/?utm_source=ig_web_copy_link

तिचा हा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. तिचे अनेक चाहते तिच्या या फोटोवर जोरदार कमेंट करत आहे. तसेच अनेक कलाकार देखील कमेंट करत आहेत.

मितालीच्या‌ कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘उर्फी’, ‘फ्रेशर्स’, ‘यारी दोस्ती’, ‘बिल्लू’, ‘आम्ही बेफिकीर’, ‘घेतला वसा टाकू नको’ या चित्रपटात आणि मालिकांमध्ये काम केले आहे. तिने २४ जानेवारी, 2021 मध्ये तिचा बॉयफ्रेंड सिद्धार्थ चांदेकर याच्याही लग्न केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा