Monday, July 8, 2024

‘तू भी अखियों से कभी मेरी…’, म्हणत मितालीने केला सुंदर फोटो शेअर, चाहतेही फिदा

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक ग्लॅमरस अभिनेत्री आहेत. आज त्यांच्या ग्लॅमरची संपूर्ण दुनिया दीवानी आहे. यातीलच एक नाव म्हणजे मिताली मयेकर होय. मिताली तिच्या वैयक्तिक आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे. याची प्रचिती तिच्या सोशल मीडिया पोस्टवरून येतच असते. तिचे नवनवीन फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे चाहते देखील तिच्या या फोटोला भरभरून प्रतिसाद देत असतात. अशातच तिने सोशल मीडियावर तिचा साडीमधील एक फोटो पोस्ट केला आहे.

मितालीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे. या फोटोमध्ये मितालीने केशरी आणि हिरवा काठ असलेली साडी घातलेली आहे. यावर तिने डीप नेक हिरव्या रंगाचा ब्लाउज घातला आहे. मिडल पार्टेशन करून तिने सगळे केस मागे बांधले आहेत. यासोबत कानात मोठे इअरिंग घातले आहेत. तसेच कपाळाला छोटीशी टिकली लावली आहे. नाकात नोजपिन घातली आहे. या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. (marathi actress mitali mayekar’s saree look glamarous photos viral on social media)

हा फोटो शेअर करून तिने “तू भी अखियों से कभी मेरी अँखियों की सुन” असे कॅप्शन दिले आहे. तिचा हा फोटो अनेकांना खूप आवडला आहे. तिचे चाहते सातत्याने या फोटोवर कमेंट करत आहेत. यासोबतच अभिनेत्री क्रांती रेडकर हिने देखील या फोटोवर कमेंट केली आहे. तसेच तिच्या एका चाहत्याने “सुरिली अँखियों वाली,” अशी कमेंट केली आहे. तसेच तिचे बाकी चाहते देखील या फोटोवर कमेंट करत आहेत.

मितालीच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर तिने इरफान खानच्या ‘बिल्लू’ या हिंदी चित्रपटातून बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. यात मिताली इरफान खानच्या मुलीच्या भूमिकेत दिसली होती. नंतर तिने ‘असंभव’, ‘अनुबंध’, ‘उंच माझा झोका’, ‘तूच माझा सांगती’ अशा मालिकेमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत. नंतर ‘उर्फी’मध्ये मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारत तिने मराठीसिनेसृष्टीत पाऊल ठेवले. ‘फ्रेशर्स’, ‘आम्ही बेफिकर’, ‘स्माईल प्लिज’, ‘हॅशटॅग प्रेम’ या चित्रपटातील तिच्या अभिनयाने तिला बरीच प्रसिद्धी मिळवून दिली. तसेच तिने ‘लाडाची मी लेक गं!’ या मालिकामध्ये देखील काम केले आहे. या मालिकेत तिच्यासोबत आरोह वेलणकर आणि स्मिता तांबे हे मुख्य भूमिकेत होते.

मितालीने या वर्षाच्या सुरुवातीला तिचा बॉयफ्रेंड सिद्धार्थ चांदेकर याच्याशी लग्न केले आहे. ते मागील बरेच वर्षांपासून रिलेशनमध्ये होते. त्यांच्या लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘इथे सूर्यप्रकाश येतोय…’, म्हणत अनन्या पांडेने शेअर केले घायाळ करणारे ‘ब्लॅक ऍंड व्हाईट’ फोटोशूट

-कंगनासोबत ब्रेकअपनंतर तुटून गेला होता अध्ययन; वडील शेखर यांच्या ‘या’ सल्ल्याने दिली त्याला हिंमत

निर्मात्यावर लावला होता लैंगिक शोषणाचा आरोप; तर पत्रिका वाटप होऊनही ‘या’ कारणामुळे मोडले होते शिल्पाचे लग्न

हे देखील वाचा