Monday, July 8, 2024

मितालीने शेअर केला ‘हटके’ व्हिडिओ; पारंपारिकसह अभिनेत्रीच्या मॉर्डन लूकचेही घडले दर्शन

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत मिताली मयेकर हे नाव नेहमीच असते. मिताली ही अत्यंत ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री आहे. चित्रपटासोबत सोशल मीडियावर देखील तिचा खूप वावर असतो. अनेकवेळा ती तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. सोशल मीडियावर चाहतावर्ग भरपूर असल्याने तिच्या पोस्टला देखील जोरदार प्रतिसाद मिळत असतो. अशातच तिचा पारंपारिक आणि मॉर्डन लूक असणारा एक व्हिडिओ समोर आला आहे.

मितालीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती सुरुवातीला पारंपारिक वेशात दिसत आहे, तर नंतर मॉर्डन वेशात दिसत आहे. सुरुवातीला तिने हिरव्या रंगाची पैठणी नेसलेली आहे. यावर तिने सोन्याचे दागिने आणि मंगळसूत्र घातलेले आहे. तसेच नाकात नथ कपाळी टिकली आणि हातात हिरव्या बांगड्या घातल्या आहेत. यासोबत तिने मुंडावळ्या बांधलेल्याही दिसत आहे. तर दुसऱ्या लूकमध्ये तिने पिवळ्या रंगाचा लेहंगा घातलेला आहे. यासोबत तिने ड्रेसला साजेशी अशी डायमंड ज्वेलरी घातली आहे. या दोन्ही लूकमध्ये ती फार सुंदर दिसत आहे. (marathi actress mitali mayekar’s western and traditional look viral on social media)

मितालीने शेअर केलेला हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. अनेकजण तिच्या या व्हिडिओवर कमेंट करून तिच्या या दोन्ही लूकचे कौतुक करत आहेत. तिचा हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.

मितालीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने इरफान खानच्या ‘बिल्लू’ या हिंदी चित्रपटातून बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. यात मिताली इरफान खानच्या मुलीच्या भूमिकेत दिसली होती. नंतर तिने ‘असंभव’, ‘अनुबंध’, ‘उंच माझा झोका’, ‘तूच माझा सांगती’ अशा मालिकांमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या. पुढे ‘उर्फी’मध्ये मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारत तिने मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. ‘फ्रेशर्स’, ‘आम्ही बेफिकर’, ‘स्माईल प्लिज’, ‘हॅशटॅग प्रेम’ या चित्रपटातील तिच्या अभिनयाने तिला बरीच प्रसिद्धी मिळवून दिली. तसेच तिने झी मराठीवरील ‘लाडाची गं लेक मी’ या मालिकेत देखील काम केले आहे. या मालिकेत तिच्यासोबत स्मिता तांबे होती.

मितालीने या वर्षाच्या सुरुवातीला तिचा बॉयफ्रेंड सिद्धार्थ चांदेकर याच्याशी लग्न केले आहे. सिद्धार्थदेखील एक अभिनेता आहे. तो सध्या ‘सांग तू आहेस ना’ या मालिकेत काम करत आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कैसे भुलू तुझे! सिद्धार्थच्या निधनाने अजून ही धक्क्यात आहे आसीम; सतत पाहतोय दोघांचे व्हिडिओ

-देशाबाहेरही व्यक्त केला जातोय सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाचा शोक; जॉन सीनाने वाहिली अभिनेत्याला श्रद्धांजली

-सायरा बानूंची आयसीयूमधून झाली मुक्तता; डिप्रेशन अन् ऍंजिओग्राफीबद्दल खुलासा करत डॉक्टर म्हणाले…

हे देखील वाचा