मिथिला पालकरचा समावेश मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत बोल्ड अभिनेत्रींच्या यादीत होतो. पारंपारिक लूकपासून ते अगदी बोल्ड लूकपर्यंत ती प्रेक्षकांना तिचा जलवा दाखवत असते. तिचा चाहता वर्ग देखील खूप मोठा आहे त्यामुळे तिच्या प्रत्येक पोस्टला भरभरून प्रतिसाद मिळत असतो. मागील काही दिवसांपासून मिथिला सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. अनेक बोल्ड फोटोशूट ती सोशल मीडियावर करत असते. अशातच तिचे नवीन फोटोशूट समोर आले आहे.
अलीकडेच मिथिलाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने फॅशनेबल असा लाल आणि पिवळ्या रंगाचा ब्लाऊज आणि स्कर्ट घातला आहे. यावर तिने प्लेन लाल रंगाचे लाँग शर्क घातले असल्याने, तिचा हा ड्रेस आणखीनच आकर्षक आणि लक्षवेधी दिसत आहे. तिच्या हेयर स्टाइलबद्दल सांगायचे झाले तर तिने मिडल पार्टेशन करून केस मोकळे सोडले आहेत.(Marathi actress mithila palkar share her stylish photo on social media)
मिथिलाने शेअर केलेले हे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडले असून, फोटोंवर चाहते कौतुकाचा वर्षाव करत आहेत. अनेकांनी या फोटोवर हार्ट ईमोजी पोस्ट केल्या आहेत. या आधी देखील तिने तिचे काही फोटो शेअर केले होते. तेव्हा देखील तिच्या चाहत्यांनी तिच्या फोटोंनी खूप चांगला प्रतिसाद दिला होता.
मिथिलाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, काही दिवसांपूर्वी ती ‘त्रिभंगा’ या चित्रपटात काजोलसोबत स्क्रीन शेअर करताना दिसली होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयाला भरभरून दाद मिळाली. सोशल मीडियावर सर्वात जास्त सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी मिथिला ही एक आहे. मिथिलाने तिच्या मराठी इंडस्ट्रीमधील करिअरची सुरुवात ‘वरुण नार्वेकर’ यांच्या ‘मुरांबा’ या मराठी चित्रपटातून केली आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अमेय वाघ आणि सचिन खेडेकर यांनी काम केले आहे. शिवाय तिने २०१४ मध्ये ‘माझा हनिमून’ या शॉर्ट फिल्ममध्ये काम केले आहे.
तिने २०१८ मध्ये इरफान खानसोबत ‘कारावां’ या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटातील या दोघांच्या आंबट गोड केमिस्ट्रीने सगळ्यांना खूप हसवले तसेच भावनिक देखील केले. तसेच तिने ‘कट्टी बट्टी’ या चित्रपटात देखील काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-साधना शिवदासानी जगल्या ‘अशा’ प्रकारचे जीवन, ‘या’ कारणास्तव ठोकला होता अभिनयक्षेत्राला राम राम!