Saturday, June 29, 2024

‘जाने क्या तुने कही…’, गाण्यावरील अभिनेत्री मिथिला पालकरच्या अदांंनी केले चाहत्यांना घायाळ, एकदा पाहाच

मराठी तसेच बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील अत्यंत हुशार अभिनेत्री म्हणजे मिथिला पालकर. चित्रपटसृष्टीत तिने खूप कमी काळात आपले विशेष स्थान निर्माण केले आहे. सोशल मीडियावर सक्रिय राहणाऱ्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये मिथिलाचाही समावेश होतो. तीदेखील चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर ग्लॅमरस फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. नुकताच मिथिलाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती खूपच आकर्षक दिसत आहे. या व्हिडिओवर चाहते फिदा झालेले दिसत आहेत.

मिथिलाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर फोटोशूट दरम्यानचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिने सोनेरी रंगाची साडी परिधान केली आहे. त्याचबरोबर ती विविध पोझ देतानाही दिसत आहे. यासोबतच व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला ‘जाने क्या तुने कही…’ हे गाणेही वाजत आहे. तिच्या अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत आणि कमेंट करण्यापासून स्वत: ला रोखू शकत नाहीयेत. तिच्या या व्हिडिओला आतापर्यंत १.५० लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच, या व्हिडिओवर ५०० पेक्षा अधिक युजर्सनी कमेंट्स केल्या आहेत.

यासोबतच तिने आपले याच साडीवरील काही फोटोही शेअर केले आहेत.

मिथिलाने आतापर्यंत अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. यामध्ये ‘कारवां’, ‘कट्टी बट्टी’, ‘मुरांबा’, ‘चॉपस्टिक्स’ या चित्रपटांचा समावेश आहे. ‘कारवां’ या चित्रपटात दिवंगत अभिनेता इरफान खानचाही समावेश होता. याव्यतिरिक्त तिने ‘गर्ल इन द सिटी’ आणि ‘लिटल थिंग्स’ या वेब सीरिजमध्येही काम केले आहे. त्यामुळे तिला ‘वेब क्वीन’ म्हणूनही ओळख मिळाली आहे.

कपाच्या तालावरील तिचे ‘हिची चाल तुरु तुरु…’ हे नेटकऱ्यांना खूपच आवडले होते. तेव्हापासून तिने अभिनेत्री म्हणून मिळवलेले यश हे कौतुक करण्यासारखे आहे. आपल्या अभिनयाची छाप तिने संपूर्ण जगावर पाडली आहे.

मिथिलाने नुकतेच रेणुका शहाणे लिखित आणि दिग्दर्शित ‘त्रिभंगा’ चित्रपटात काम केले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा