Monday, February 24, 2025
Home मराठी उफ्फ अदा! मिथिला पालकरच्या फोटोंनी सोशल मीडियावर घातला धुमाकूळ, पाहायला मिळाला निराळा अंदाज

उफ्फ अदा! मिथिला पालकरच्या फोटोंनी सोशल मीडियावर घातला धुमाकूळ, पाहायला मिळाला निराळा अंदाज

सध्या सोशल मीडिया हे सर्वांच्या हक्काचे स्थान झाले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर त्यांच्या आयुष्यातील अनेक घटनांचा खुलासा करत असतात. अशातच मराठी तसेच बॉलिवूड अभिनेत्री मिथिला पालकर ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर करत असते. तिच्या बोल्ड अदांनी सध्या सोशल मीडियावर आग लावली आहे. अशातच तिने पुन्हा एकदा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

मिथिलाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने सोनेरी पिवळसर रंगाचा खूप सुंदर ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसवर तिने गळ्यात एक हार घातलेला दिसत आहे. या ड्रेसवरील जॅकेट खूप सुंदर पद्धतीने डिझाईन केले आहे. तिने सगळे केस मोकळे सोडले आहे तसेच तिने न्यूड मेकअप केला आहे. या लूकमध्ये ती फार सुंदर दिसत आहे. (Marathi actress mithila palkar’s photoshoot viral on social media)

मिथिलाचे हे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहे. तिच्या चाहते सातत्याने या फोटोवर हार्ट आणि फायर ईमोजी पोस्ट करत आहेत. तिच्या या फोटोला आतापर्यंत दीड लाखापेक्षाही जास्त लाइक्स मिळाले आहेत.

मिथिलाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती मागील काही दिवसात ‘त्रिभंगा’ या चित्रपटात काजोलसोबत स्क्रीन शेअर करत होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयाला भरभरून दाद मिळाली होती. सोशल मीडियावर सर्वात जास्त सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी मिथिला ही एक आहे. मिथिलाने तिच्या करिअरची सुरुवात ‘वरुण नार्वेकर’ यांच्या ‘मुरांबा’ या मराठी चित्रपटातून केली आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अमेय वाघ आणि सचिन खेडेकर यांनी काम केले आहे. यासोबतच तिने २०१४ मध्ये ‘माझा हनिमून’ या शॉर्ट फिल्ममध्ये काम केले आहे.

तिने २०१८ मध्ये इरफान खानसोबत ‘कारवां’ या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटातील या दोघांच्या आंबट गोड केमिस्ट्रीने सगळ्यांना खूप हसवले तसेच भावनिक देखील केले. तसेच तिने ‘कट्टी बट्टी’ या चित्रपटात देखील काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘कू’ ऍपवरही कंगना रणौत गाजवतेय वर्चस्व; काही दिवसांतच मिळवले तब्बल ‘इतके’ फॉलोव्हर्स

-‘हा निव्वळ पब्लिसिटी स्टंट’, म्हणत मनोज पाटील आत्महत्या प्रकरणावर साहिल खानने सोडले मौन

-शूटिंग सोडून तुर्कीमध्ये ‘हे’ काम करताना दिसली बॉलिवूडची ‘बार्बी गर्ल’, व्हिडिओ शेअर करत म्हणतेय…

हे देखील वाचा