अभिनेत्री मोनालिसा बागलने झी मराठीवर प्रसारित होणाऱ्या ‘टोटल हुबलाक’ मालिकेद्वारे प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले आहे. या विनोदी मालिकेद्वारे मोनालिसाने लॉकडाऊनमध्ये कंटाळलेल्या प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले.
कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांकडे पाहता, या वर्षी पुन्हा लॉकडाऊन लावले गेले आहे. जवळजवळ संपूर्ण अभिनय क्षेत्राचे कामकाज ठप्प पडले आहे. अशा काळात कलाकार सोशल मीडियावर वेळ घालणे पसंत करतात. मोनालिसा ही त्याच कलाकारांपैकी एक आहे. अभिनेत्री सतत आपले ग्लॅमरस फोटो शेअर करून चर्चेचा विषय बनते.
मोनालिसा नेहमी इंस्टाग्रामवर काही ना काही पोस्ट करत असते. ज्यात चाहत्यांना तिची सुंदरता पाहायला मिळते. नुकतेच तिने काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये सुंदरतेसह तिचा फिट अँड फाईन लूकही पाहायला मिळतोय. यात तिने गुलाबी रंगाचा प्रिंटेड फ्रॉक घातला आहे. चाहतेही तिच्या या फोटोंना खूप प्रेम देत आहेत.
गेल्या लॉकडाऊनमध्ये मोनालिसाने इतरत्र वेळ वाया न घालवता, आपल्या फिटनेसकडे लक्ष दिले. खरं तर अभिनेत्री एका चित्रपटासाठी वजन कमी करत होती. सर्व काही सुरळीत चालू असताना, अचानक लॉकडाऊन लागले. सिनेसृष्टीला ब्रेक लागला. अशामध्ये मोनालिसाने वजन फक्त कमीच केले नाही, तर ते मेंटेन करण्याकडेही विशेष लक्ष दिले.
मोनालिसाने ‘सौ. शशी देवधर’ या चित्रपटाद्वारे बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. या लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटात, तिने सई ताम्हणकरच्या लहानपणीची भूमिका साकारली होती. भलामोठा ब्रेक घेतल्यानंतर ती ‘प्रेम संकट’ चित्रपटात दिसली, मात्र तिला खरी ओळख ‘झाला बोभाटा’ या चित्रपटातून मिळाली. यानंतर मोनालिसाने ‘ड्राय डे’, ‘पैंजण’, ‘परफ्यूम’, ‘गस्त’ अशा अनेक चित्रपटांत अभिनय केला.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-










