Wednesday, July 2, 2025
Home मराठी काय सांगता? ‘या’ मराठी अभिनेत्रीने बहिणीलाच बांधली राखी; म्हणे, ‘ती मला मोठ्या भावासारखीच’

काय सांगता? ‘या’ मराठी अभिनेत्रीने बहिणीलाच बांधली राखी; म्हणे, ‘ती मला मोठ्या भावासारखीच’

भाऊ बहिणीच्या पवित्र धाग्यात बांधणारा सण म्हणजेच रक्षाबंधन नुकताच पार पडला. हिंदू संस्कृतीतील एक महत्वाचा सण म्हणून रक्षाबंधनच्या सणाकडे पाहिले जाते. रक्षाबंधनच्या दिवशी बहिण आपल्या भावाला ओवाळते, राखी बांधते. नुकताच पार पडलेल्या रक्षाबंधनाच्या सणाचे फोटो सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केले होते.यामध्ये फक्त सामान्य नेटकरीच नव्हेतर सिने जगतातील कलाकारांनीही सोशल मीडियावरुन हे खास फोटो शेअर केले होते. मात्र मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री मोनालिसा बागलच्या पोस्टने मात्र सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. काय होते तिच्या या खास पोस्टचे वैशिष्ट, चला जाणून घेऊ. 

मराठी सिनेसृष्टीतील अनेक अभिनेत्री त्यांच्या अभिनयाईतक्याच सोशल मीडियावरही चांगल्याच प्रसिद्ध असतात. यामध्ये अभिनेत्री मोनालिसा बागलचेही (Monalisa Bagal) नाव घेतले जाते. आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि सोज्वळ सौंदर्याने मोनालिसाने सिने जगतात अल्पावधीत लोकप्रियता मिळवली आहे. ती सोशल मीडियावरही चांगलीच प्रसिद्ध असते. ज्यावरुन ती नेहमीच फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसत असते. रक्षाबंधनच्या सणाचेही खास फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. ज्याने नेटकऱ्यांचे चांगलेच लक्ष वेधले.

मोनालिसाच्या या फोटोंची चर्चा होण्याचे कारण म्हणजे तिने तिच्या भावाला नव्हेतर आपल्या बहिणीला राखी बांधली आहे. या फोटोमध्ये मोनालिसा आपल्या लहान बहिणीला म्हणजेच अश्विनी बागलला राखी बांधताना दिसत आहे. या फोटोसोबत मोनालिसाने “मी सारी जिंदगी माझी, तुला जपणार आहे,” असा गोड कॅप्शनही दिला आहे. तिच्या या फोटोसोबतच मोनालिसाच्या लूकनेही नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. फोटोमध्ये ती खूपच मनमोहक दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Monalisa Bagal (@monalisabagal)

दरम्यान अभिनेत्री मोनालिसाने झाला बोभाटा या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दिला सुरूवात केली होती. त्याचबरोबर तिने  करंट, गावरंभा, भिरकीट अशा गाजलेल्या चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्याचबरोबर तिने का रं देवा या चित्रपटातही अभिनय केला होता.

हेही वाचा –कथित एमएमएसवर अंजली अरोराने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाली, ‘माझ्या लहान भावानेही…’ .
तैमूरने पहिल्यांदा पाहिला बॉलिवूड सिनेमा, वडिलांचा नाही तर ‘या’ अभिनेत्याचा झालाय जबरा फॅन
आहा कडकच ना! मौनीच्या नव्या फोटोंनी वाढवले सोशल मीडियाचे तापमान

 

हे देखील वाचा