Saturday, June 29, 2024

‘नवऱ्यालाच शिकव म्हणजे झालं….,’ अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा सून शिवानी रांगोळे हिला मजेशीर सल्ला

मराठी मालिका विश्वात सध्या अनेक नव्या मालिकांची भर पडत आहे. यात आता आणखी एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. या मालिकेतून अभिनेता हृषिकेश शेलार आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे ही जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मालिका विश्वातील ही नवी जोडी सध्या चर्चेचा विषय ठरतेय. या मालिकेतील अक्षरा म्हणजेच शिवानी रांगोळे हिने नुकतेच विराजस कुलकर्णी याच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. शिवानी आणि तिच्या सासूबाई म्हणजेच मृणाल कुलकर्णी यांचे नाते सर्वांनाच माहित आहे. त्या दोघी एकत्र समारंभांना एकत्र हजेरी लावताना दिसतात. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतून ती बऱ्याच दिवसानंतर मालिकेत दिसत आहे. यामुळे तिच्या सासूबाई मृणाल कुलकर्णी यांनी एक खास पोस्ट केली आहे.

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ (Tula Shikwin Changlach Dhada) ही मालिका 13 तारखेपासून सुरु झाली आहे. कालच (13 मार्च) या मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला. या मालिकेत शिवानी प्रमुख भूमिकेत दिसत आहे. तिच्या व्यक्तिरेखेचे नाव अक्षरा अस आहे. या मालिकेच्या निमित्ताने अजून एक सरप्राईझ प्रेक्षकांसाठी असणार आहे ते म्हणजे हृषिकेश आणि शिवानी सोबत कविता लाड-मेढेकर आणि विजय गोखले हे देखील मध्यवर्ती भूमिकेत असणार आहेत. कविता लाड आणि विजय गोखले बऱ्याच काळानंतर मालिका विश्वात झळकणार आहेत.

शिवानी मालिकेसाठी खूपच उत्सुक आहेच पण त्याहीपेक्षा जास्त उत्सुक तिचे कुटुंबीय आहे. मृणाल कुलकर्णी यांनी तिच्यसाठी एक खास पोस्ट केली आहे. यात त्यांनी शिवानी आणि तिच्या टीमला मालिकेसाठी शुभेच्छा दिल्या आहे. त्याबरोबरच त्यांनी एक मजेशीर सल्ला ही तिला दिला आहे.

मृणाल कुलकर्णी यांनी शिवानीसाठी पोस्ट मध्ये लिहिले आहे की, “प्रिय शिवानी, तुझ्या नवीन मालिकेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा! तुला ‘अक्षरा’ च्या भूमिकेत बघायला उत्सुक आहोत! मला खात्री आहे तु धमाल उडवून देशील पण धडे मालिकेतल्या सासूला आणि नवऱ्यालाच शिकव म्हणजे झालं! या मालिकेच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा !”
आता त्यांची ही पोस्ट खुप चर्चेत आली आली असून त्यांचे आणि शिवानीमध्ये असलेले हे नाते आणि त्यांचा हा गमतीशीर अंदाज नेटकऱ्यांना खुप आवडला आहे.


या दोघी सासू सुनेची जोडी लवकरच एका चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचं नाव ‘फक्त महिलांसाठी’ असं आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मृणाल कुलकर्णी जवळपास 8 वर्षांनी दिग्दर्शिका म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. (marathi-actress-mrinal-kulkarni-share-post-for-daughter-in-law-shivani-rangole)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
धक्कादायक! मनोरंजनविश्वातील ‘या’ अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केली तिची सुसाईड नोट म्हणाली, ‘माझ्या आत्महत्येला…’
मोठी बातमी: अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर मधमाशांचा हल्ला

हे देखील वाचा