मराठी सिनेसृष्टीतील सूंदर आणि प्रतिभावान अभिनेत्रींमध्ये मृण्मयी देशपांडेचाही समावेश होतो. तिने वेगवेगळ्या भूमिका साकारून आपल्या अभिनयाची झलक चाहत्यांना दिली आहे. साल २०१२ मध्ये झी मराठीवर ‘कुंकू’ ही मालिका सुरू झाली होती. या मालिकेद्वारे ती घरघरात पोहचली. यातील ‘जानकी’ हे पात्र चांगलेच गाजले. केवळ मालिकाच नव्हे तर नाटक आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमातून मृण्मयीने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. याशिवाय काही दिवसांपूर्वीच तिने ओटीटीवर देखील दमदार एन्ट्री मारली आहे. सिनेसृष्टीत सक्रिय राहणारी अभिनेत्री सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असल्याचे दिसते. सतत फोटो पोस्ट करून, ती चाहत्यांना तिच्याबद्दल अपडेट देत असते.
अलीकडेच मृण्मयीने तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. हे ब्लॅक ऍंड व्हाईट फोटो आहेत, जे अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. तिने एकूण ५- ६ फोटो शेअर केले आहेत, ज्यात तिची निरागस सुंदरता पाहायला मिळत आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, मृण्मयीने गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. सोबतच ती आपल्या अदा दाखवत फोटोसाठी पोझ देते आहे. (marathi actress mrunmayee deshpande flaunt her beauty in pink saree)
चाहत्यांनी अभिनेत्रीच्या या फोटोंना पसंती दर्शवली आहे. लाईक आणि कमेंट करून नेटकरी यावर प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. आतापर्यंत या फोटोवर २५ हजाराहून अधिक युजर्सने लाईक केलं आहे.
कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर ‘इट्स ब्रेकिंग न्यूज’ या हिंदी चित्रपटाद्वारे मृण्मयीने अभिनयात पदार्पण केले होते. त्यानंतर ‘मोकळा श्वास’ मधील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. अभिनेत्रीने ‘कट्यार काळजात घुसली’, ‘स्लॅमबुक’, ‘नटसम्राट’, ‘फर्जंद’, ‘शिकारी’ यासह अनेक चित्रपटात काम केले आहे. आता ती ‘सा रे ग म लिटल चॅम्प्स’ हा गायन शोला होस्ट करताना दिसत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘या’ मराठी चित्रपटांना तोड नाही! लक्ष्याचे ‘हे’ पाच अफलातून चित्रपट तुम्ही पाहिलेत का?