स्टार प्रवाह या वाहिनीवरील ‘अग्निहोत्र’ या मालिकेतून तिच्या करिअरला सुरुवात करणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे. ‘कुंकू’ या लोकप्रिय मालिकेत जिला बघून प्रत्येक घरातील सासूला वाटायचे की, सून असावी तर अशी. तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने आज प्रत्येक मराठी माणसाच्या मनावर तिचा ठसा उमटला आहे. मृण्मयी सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. अशातच तिचा एक बोल्ड लूकमधील फोटो समोर आला आहे.
मृण्मयीने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा वन ऑफ शोल्डर लाँग ड्रेस घातला आहे. या ड्रेसवर तिने केवळ कानात ईअरिंग घातले असून, हातात ब्रेसलेट घातले आहे. तिने केसांची पोनीटेल घातली आहे तर तिच्या डोळ्यातील गडद काजळ तिचा लूक पूर्ण करत आहे. या लूकमध्ये ती फारच सुंदर दिसत आहे.
मृण्मयीने शेअर केलेला हा फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. चाहते नेहमीप्रमाणे या फोटोवर प्रतिक्रिया देऊन तिचे कौतुक करत आहेत. तिच्या एका चाहत्याने या फोटोवर “अप्रतिम” अशी कमेंट केली आहे. तसेच बाकी अनेक चाहते हार्ट आणि फायर ईमोजी पोस्ट करत आहेत.
मृण्मयी ही मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेली नायिका आहे. तिने तिच्या करिअरमध्ये मराठी तसेच हिंदी मालिकेत देखील काम केले आहे. मराठीतील तिचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. तिने ‘नटसम्राट’, ‘फर्जंद’, ‘मन फकिरा’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘बोगदा’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. तिने झी मराठीवरील ‘कुंकू’ या लोकप्रिय मालिकेमध्ये काम केले आहे. तसेच तिने ‘अग्निहोत्र’ आणि ‘छत्रीवाली’ या मालिकांमध्ये काम केले आहे. ती सध्या ‘सारेगामापा लिटिल चॅम्प्स’ या शोचे सूत्रसंचालन करत आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-मलायका अरोराला आवडतो ‘अशा’प्रकारचा व्यक्ती, मिलिंद सोमणपुढे केला खुलासा
-निधन झाले गायिकेचे, पण सपना चौधरीलाच ठरवले मृत; अफवेने उडाली होती कुटुंबीयांची झोप
-ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे ट्विटर अकाऊंट कायमचे बंद, ‘ही’ आहे शेवटची पोस्ट